adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धरणगाव येथे संत रविदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी

 धरणगाव येथे संत रविदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी  विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) धरणगाव : येथील राष्ट्रीय चर्मकार मह...

 धरणगाव येथे संत रविदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी 


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव : येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे संत रविदास यांची ६४९वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. येथील बस स्थानकासमोरील स्मारकावर धरणगाव चा लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ लीलाताई सुरेश चौधरी उपनगराध्यक्ष सुरेखा विजय महाजन ह भ प भगवान बाबा महाराज राष्ट्रीय चर्मकार संघाचे कार्याध्यक्ष भानुदास आप्पा विसावे समाजाच्या नगरसेविका सौ अंजलीताई विसावे पोलीस निरीक्षक सुनील पवार साहेब यांच्या हस्ते पूजन करण्यात आले तसेच पाच दाम्पत्यांच्या हस्ते आरती व पूजा करण्यात आली. तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक व समाजबांधवांनीही पूजा केली. यावेळेस संत रविदास महाराजांच्या जीवनाबद्दल माहिती ह भ प भगवान बाबा महाराज यांनी माहिती दिली तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ लीलाताई चौधरी यांनी सांगितले की सर्वच महापुरुषांच्या जयंती सर्व समाज बांधवांनी साजऱ्या कराव्यात या वेळी उपस्थित शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ माळी समाजाचे अध्यक्ष व्ही.टी. माळी सर , आर. डी. महाजन, कैलास माळी सर नगरसेवक निलेश चौधरी ,पप्पू भावे, विलास महाजन, गुलाब मराठे, तौसिफ पटेल डॉक्टर लीलाधर बोरसे तसेच नगरसेविका सौ हेमांगी अग्निहोत्री, सौ प्रमिला शिरसाट, सौ मंदाकिनी येवले, अक्काबाई चव्हाण प्रा. कविता महाजन इतर तसेच समाजाच्या महिला सुनिता लिंगायत, मंगला मोरे, रेखा लिंडाईत, सौ सावकारे, विजया महाले, आशा वाघ, कोकिलाबाईविसावे, विमलबाई वाडले, सुरेखा बन्सी धरणगाव चर्मकार समाजाचे तालुकाध्यक्ष दिलीप वाघ,सर शहराध्यक्ष धर्मराज मोरे, विकास मोरवकर, मयूर मोरावकर, संजय बंसी, हरि बंसी, गजानन वाघ ,हरीश विसावे , आर. बी महाले सिताराम लिंगायत तसेच आदींसह महिला व समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments