adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाचे जुने गेट सुरू करण्याची मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा

 साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाचे जुने गेट सुरू करण्याची मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा  भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल शहरात...

 साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाचे जुने गेट सुरू करण्याची मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल शहरातील साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शाळेचे पूर्वीचे समोरील गेट तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी जोरदार मागणी पालक व नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत यावल नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी निवेदन देण्यात आले आहे.

साने गुरुजी माध्यमिक विद्यालय हे यावल नगर परिषदेच्या अखत्यारीत असून अलीकडे शाळेच्या मागील बाजूस नवीन गेट तयार करण्यात आले आहे. मात्र हे गेट विद्यार्थ्यांच्या, विशेषतः मुलींच्या सोयीचे नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या गेटमुळे मुलींची गैरसोय होत असून, गैरप्रकार घडण्याची तसेच विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

यामुळे शाळेच्या समोरील बाजूस असलेले पूर्वीचे जुने गेट पुन्हा सुरू करण्यात यावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवेश मिळेल, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करावी व पालक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी, अशीही विनंती करण्यात आली आहे. जर लवकरात लवकर पूर्वीचे गेट सुरू करण्यात आले नाही, तर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी जळगाव तसेच गटशिक्षणाधिकारी यावल यांना पाठविण्यात आली आहे. यावेळी प्रभाग क्रमांक १० चे नगरसेवक योगेश विजय चौधरी यांच्यासह चेतन अढळकर, रोशन येवले, अतुल चौधरी, मुकेश कोळी, व्यंकटेश बारी, नितीन बारी, रितेश बारी व उज्वल कानडे आदी उपस्थित होते.

No comments