adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ज्ञानपूर्ण विद्यालय व जुनिअर कॉलेज इच्छापुर निमखेडी येथे स्नेहसंमेलन संपन्न

 ज्ञानपूर्ण विद्यालय व जुनिअर कॉलेज इच्छापुर निमखेडी येथे स्नेहसंमेलन संपन्न  किरण धायले मुक्ताईनगर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ज्ञानोदय म...

 ज्ञानपूर्ण विद्यालय व जुनिअर कॉलेज इच्छापुर निमखेडी येथे स्नेहसंमेलन संपन्न 


किरण धायले मुक्ताईनगर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

ज्ञानोदय मंडळ अंतुर्ली संचलित ज्ञान पूर्णा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज इच्छापुर निमखेडी येथे विद्यार्थी विद्यार्थिनींचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले .या ठिकाणी जिल्हा परिषद मराठी शाळा इच्छापुर ,जि प मराठी शाळा निमखेडी, जि प मराठी शाळा महालखेडा ,जि प मराठी शाळा टाकळी येथील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एस. ए .भोईसर होते कार्यक्रमाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी वसंतराव मोरे यांनी केले. प्रमुख उपस्थितीत शालेय समिती चेअरमन अनिल वाडीले, सरपंच गणेश थेटे पाटील गुलाब  बेलदार,प्राचार्य बि.डी.बारी सर, केंद्रप्रमुख गणेश  कोळी,शालेय पोषण आहार अधिकारी कोंगे साहेब, जि प शाळा निमखेडी येथील कांडेलकर, परिसरातील जि. प .शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

           कार्यक्रमात विविध वेशभूषेत बालगीते, देशभक्तीपर गीते , विविध महापुरुषांवर बसवलेली गाणी, नाटके विद्यार्थी विद्यार्थिनींनी सादर केले. विद्यार्थ्यांना ज्ञानोदय मंडळातर्फे,परिसरातील नागरिकांकडून, पालकांकडून प्रोत्साहनपर बक्षिसे वाटप करण्यात आले.

       सूत्रसंचालन प्रा.विनायक वाडेकर व आभार शिक्षक महेंद्र तायडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्ञानपूर्णा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

No comments