adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बालरुग्णालयातील उपचार संशयाच्या भोवऱ्यात; एक वर्षीय बाळाच्या मृत्यूची पोलिसांत तक्रार

  बालरुग्णालयातील उपचार संशयाच्या भोवऱ्यात; एक वर्षीय बाळाच्या मृत्यूची पोलिसांत तक्रार वाशिम प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  वाशिम ...

 बालरुग्णालयातील उपचार संशयाच्या भोवऱ्यात; एक वर्षीय बाळाच्या मृत्यूची पोलिसांत तक्रार


वाशिम प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 वाशिम जिल्ह्यातील डॉ.विजय कानडे यांचा बाल रुग्णालय असुन या ठिकाणी सारांश आदेश वाकुडे हा १ वर्षाचा चिमुकला  मयत झाला. त्यामुळे या  एक वर्षीय बाळाच्या मृत्यू डॉक्टर विजय कानडे हेच जबाबदार आहेत असा गंभीर आरोप त्या मुलाच्या आई-वडिलांनी केला आहे .

सविस्तर वृत्त असे की , दिनांक ९/१/२०२६ रोजी सारांश आदेश वाकुडे हा एक वर्षीय चिमुकला किरकोळ इलाजकरीता दाखल झाला होता .परंतु डॉ. विजय कानडे यांनी महात्मा फुले योजनेचा लाभ देतो म्हणून आपल्या मुलाला दवाखान्यात भरती केले आणि प्रकृती खराब झाल्याने डॉक्टर विजय कानडे यांनी अकोला येथे रेफर केले . माझ्या मुलाला हायडोस ट्रीटमेंट केल्याने माझ्या मुलाची प्रकृती दिनांक 18/ 1/ 2026 रोजी गंभीर झाल्याचे मयत चिमुकल्याच्या आई वडिलाचे आरोप केला आहे . आम्ही पुढील उपचाराकरिता आमच्या बाळाला अकोला येथे डॉ.शिरीष देशमुख यांच्या  दवाखान्यात भरती केले . परंतु दिनांक 30 /1/ 2026 रोजी माझ्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  माझ्या मुलाला किरकोळ आजार होता त्या इलाजाकरिता डॉ. विजय कानडे वाशिम यांच्या दवाखान्यात उपचारा करिता नेले होते.  परंतु डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे आणि डॉक्टरांच्या निष्काचेपणामुळे तसेच शासकीय योजनेचा  लाभ देण्याचे आश्वासन देऊन डॉक्टरांनी हायडोस ट्रीटमेंट दिली व माझ्या मुलाची प्रकृती गंभीर झाली त्यामुळे माझ्या मुलाच्या मृत्यूस डॉ.विजय कानडे हेच जबाबदार आहेत . असा आरोप मयत चिमुकल्याच्या आई-वडिलांनी केला आहे. माझ्या मुलाला निमोनिया व लाल पांढऱ्या पेशा सुद्धा वाढल्या.  त्यामुळे आपणास अतिदक्षता कक्षात भरती करावे लागेल असे म्हणून त्यांनी सरकारी योजनेतून त्यांना तिप्पट रक्कम हवी होती.  म्हणून त्यांनी माझ्या मुलाच्या जीवाचा खेळ केला आणि पैशाच्या हव्याशापोटी त्यांनी माझ्या मुलाचा अंत केला.  माझ्या मुलाला चुकीची ट्रीटमेंट देण्यात आली व त्यामुळे त्याची प्रकृती गंभीर झाली.  माझा मुलगा हा गंभीर आजारी नव्हता त्याला किरकोळ आजाराकरिता डॉ.विजय कानडे यांच्या दवाखान्यात आणले होते.  त्यामुळे माझा मुलगा हा डॉ. विजय कानडे यांच्याच चुकीमुळे तो मयत पावला आहे.  त्यामुळे डॉ.विजय कानडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची सनद जप्त करावी व त्यांच्या दवाखान्याला सील ठोकावे. ज्यामुळे आमच्या सारख्या दुसऱ्या मुलाचा पुन्हा मृत्यू होणार नाही अशी मागणी मुलाच्या आई-वडिलांनी केली आहे. 


डॉ. विजय कानडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा ,त्यांची सनद जप्त करावी आणि त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मयत सारांश आदेश वाकुडे या बाळाच्या आई-वडिलांनी दिनांक ०६/०२/२०२६ रोजी  वाशिम पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार द्वारे  केली आहे. या प्रकरणांमध्ये योग्य ती चौकशी आणि तपास करून योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन शहर पोलीस स्टेशन वाशिम यांच्या वतीने देण्यात आले आहे. या प्रकरणात योग्य ती चौकशी करावी आणि डॉक्टर दोषी  आढळल्यास संबंधित दोषी डॉक्टर यांच्यावर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करावे आणि त्यांची सनद जप्त करावी त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे वाशिम जिल्हाध्यक्ष दौलतराव हिवराळे , ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष जगदीश मानवतकर, अखिल भारतीय मातंग महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष संजय भाऊ वैरागडे राजकुमार पडघान, माधव डोंगरदिवे, रामदास कालापाड , अक्षय इंगोले यांच्यासह सर्व उपस्थित नातेवाईकाने आणि आंबेडकरी  कार्यकर्ते यांनी केली आहे.

No comments