सरदार वल्लभ भाई पटेल इंग्लिश मिडीयम व सेमी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये रंगला विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार भरत कोळी यावल (संपादक -...
सरदार वल्लभ भाई पटेल इंग्लिश मिडीयम व सेमी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये रंगला विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल दि. 8 फेब्रुवारी 2020 रोजी यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम & सेमी इंग्लिश मीडियम स्कूल चा सांस्कृतिक वार्षिक उत्सव पद्मावती हॉल (धनश्री टॉकीज) येथे पार पडला. शाळेचे अध्यक्ष डॉक्टर श्री प्रदीप माहेश्वरी सर यांच्या अध्यक्षतेखाली व शाळेच्या मुख्याध्यापिका शीला तायडे मॅडम यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम घेण्यात आला. वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवप्रसाद राजेश पुरोहित हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री रंगनाथ धारबडे पी आय साहेब, यावल, श्री अजय वाढवे ए पी आय साहेब यावल, श्री विश्वनाथ धनके सर बी ई ओ यावल, श्री प्रदीप माहेश्वरी सर प्रेसिडेंट एस व्ही पी स्कूल यावल, श्री हेमराज हेगडे, श्री डॉ.सोहम महाजन फैजपूर श्री स्वप्निल बोरसे, श्री साईदास पवार सर, श्री मिलिंद भालेराव सर, श्री रवींद्र वाणी सर, सौ माया तडवी, श्री रुबाब तडवी, श्री अयुब खान सर, श्री ॲड. नितीन चौधरी सर यांची उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत लेझीम पथकाने करण्यात आली नंतर इशस्तवन व स्वागत गीत हे इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी सादर केले. व नंतर सरस्वती व गणेश पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर शाळेचे अध्यक्ष डॉ. श्री. प्रदीप माहेश्वरी सर व सौ शीला तायडे मॅडम यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री प्रदीप माहेश्वरी सर यांच्या हस्ते सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन केले विद्यार्थ्याच्या कलागुणांची प्रशंसा करून त्यांना अभ्यासाच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे अंगी असलेले विविध कला गुण व त्या कलागुणांचा आपण जोपासना केली पाहिजे असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात गणेश स्तवनाने झाली त्यानंतर सरदार वल्लभभाई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्य कलांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांचे बक्षीस वाटप समारंभ करण्यात आला यामध्ये शाळेत क्रीडा सप्ताह आयोजित करण्यात आला होता त्यातील यशस्वी विद्यार्थ्यांना मेडल देऊन गौरव करण्यात आला व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन त्यांच्या कलागुणांना वाव देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अर्चना चौधरी मॅडम व सौ तृप्ती पवार मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ भाग्यश्री सोरते मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .

No comments