भोरगाव लेवा पाटीदार पंचायत ठाया पाडळसे, जळगाव विभागामार्फत नवनिर्वाचित नगरसेवक सत्कार सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे या...
भोरगाव लेवा पाटीदार पंचायत ठाया पाडळसे, जळगाव विभागामार्फत नवनिर्वाचित नगरसेवक सत्कार सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची प्रमुख उपस्थिती
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव : भोरगाव लेवा पाटीदार पंचायत ठाया पाडळसे, जळगाव विभागामार्फत नवनिर्वाचित महापौर, नगराध्यक्ष व नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमात विविध नगरपालिकांमधून निवडून आलेल्या महापौर, नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा पंचायततर्फे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना रक्षाताई खडसे यांनी लोकप्रतिनिधींनी जनतेच्या विश्वासास पात्र ठरत विकासकामांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. तसेच नव्या जबाबदाऱ्यांसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी पंचायत कुटुंबनायक श्री. ललितदादा पाटील यांनी समाजाच्या एकतेवर भर देत लोकप्रतिनिधींनी समाजहित जपावे, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमास आमदार सुरेश (राजुमामा) भोळे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, जळगावच्या महापौर दीपमाला काळे, प्रा. पी. आर. चौधरी, श्री. संजयदादा राणे तसेच श्री. विष्णू भंगाळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली असून, वातावरण उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते.




No comments