व्यापाऱ्यांकडून ८ लाखांची बॅग लूट प्रकरण! सात जणांची टोळी अटकेत रावेर पोलीसांची दमदार कामगिरी रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हे...
व्यापाऱ्यांकडून ८ लाखांची बॅग लूट प्रकरण! सात जणांची टोळी अटकेत रावेर पोलीसांची दमदार कामगिरी
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील खानापूर ते चोरवड दरम्यान मध्यप्रदेशातील एका मसाला व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्यांना रस्त्यावर अडवून ८ लाख रुपयांची बॅग लुटून नेणाऱ्या रावेरातील ७ संशयित आरोपींना जेरबंद करण्यात रावेर पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून मुख्य पसार झाला असून त्या फरार आरोपीचा रावेर पोलीस शोध घेत आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील मसाला व्यापारी दीपक सुरेश धर्मानी यांचे कर्मचारी गौरव वाघ आणि तौफिक तेली हे ६ फेब्रुवारी रोजी सावदा, फैजपूर आणि रावेर परिसरातून मालाची वसुली करून परतत होते. रात्री ९ वाजेच्या सुमारास खानापूर आरटीओ बॅरेलजवळ ८ ते ९ जणांनी दुचाकीवरून येत त्यांची गाडी अडवली आणि पैशांची बॅग हिसकावून नेली. याप्रकरणी ७ फेब्रुवारी रोजी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रावेर पोलीस स्टेशन चे शिस्तप्रिय कर्तव्यदक्ष कार्यतत्पर पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला.तांत्रीक विश्लेषण व आवश्यक धागेदोरे हाताळून घटनास्थळी कॅमेरे नसल्याने आणि रात्र असल्याने सुरुवातीला अडचणींचा सामना करीत. पोलिसांनी रावेर, सावदा आणि फैजपूर परिसरातील तब्बल ६७ सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी बंडू चौक परिसरातील ७ संशयितांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
यात फारूख शेख रईस वय १९, अत्ताउल्लाह खान दाऊद खान उर्फ सोनू, शेख सईद शेख कादार उर्फ सुपडू, शेख समिर शेख कलीम उर्फ चिकू, साहिल खान दाऊद खान, रहेमान खान अय्युब खान उर्फ भुऱ्या, अक्रम खान इस्माईल खान सर्व रा. बंडू चौक, रावेर अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. संशयित आरोपींकडून ९५ हजार रुपये किमतीच्या दोन मोटार सायकली आणि २ लाख ५५ हजार रुपये रोख, असा एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी 'हसन फावड्या' (रा. रुस्तम चौक) हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि तुषार पाटील, पोहेकॉ सुनिल वंजारी, एलसीबीचे कल्पेश आमोदकर, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, विकारोद्दीन शेख, अतुल गाडीलोहार, गजानन बोने यांनी केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील हे करीत आहे.

No comments