adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रामपुरा वॉर्ड क्र.३ मधील ३०० बालकांचे भविष्य अंधारात ? शासकीय अंगणवाडी तात्काळ सुरू करण्याची जोरदार मागणी:- हेमकांत गायकवाड

 रामपुरा वॉर्ड क्र.३ मधील ३०० बालकांचे भविष्य अंधारात ?  शासकीय अंगणवाडी तात्काळ सुरू करण्याची जोरदार मागणी:-  हेमकांत गायकवाड  चोपडा प्रतिन...

 रामपुरा वॉर्ड क्र.३ मधील ३०० बालकांचे भविष्य अंधारात ?  शासकीय अंगणवाडी तात्काळ सुरू करण्याची जोरदार मागणी:-  हेमकांत गायकवाड 


चोपडा प्रतिनिधी 

चोपडा – शहरातील रामपुरा वार्ड क्र. ३ येथे शासकीय अंगणवाडी केंद्र नसल्यामुळे सुमारे २५० ते ३०० लहान बालके पूर्वप्राथमिक शिक्षण व पोषण आहारापासून वंचित राहत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते हेमकांत बळीराम गायकवाड यांनी विविध शासकीय स्तरावर निवेदन देत तात्काळ अंगणवाडी मंजूर करून सुरू करण्याची मागणी केली आहे. रामपुरा वार्ड क्र. ३ हा भाग आर्थिकदृष्ट्या दुर्बल, कष्टकरी व आदिवासी समाजाची वस्ती असलेला असून संपूर्ण वार्डची लोकसंख्या अंदाजे २,००० ते ३,००० दरम्यान आहे. ० ते ६ वयोगटातील बालकांची संख्या मोठ्या प्रमाणात असतानाही परिसरात शासकीय अंगणवाडी उपलब्ध नसल्यामुळे बालकांच्या शैक्षणिक व शारीरिक विकासावर परिणाम होत आहे.

पूर्वी या भागात एक खाजगी अंगणवाडी कार्यरत होती; मात्र काही कारणास्तव ती बंद पडली. त्यामुळे शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत मिळणारा पोषण आहार, लसीकरण व आरोग्य सुविधा येथील बालकांना मिळत नाहीत. परिणामी, कुपोषणाचा धोका वाढण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. हेमकांत गायकवाड यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, महिला व बालविकास विभाग, जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांनीही या मागणीला जोरदार पाठिंबा दर्शविला असून प्रशासनाने त्वरित कार्यवाही करून रामपुरा वार्ड क्र. ३ येथे शासकीय अंगणवाडी सुरू करावी, अशी सर्वसामान्यांची ठाम अपेक्षा आहे.

No comments