VJNT विभागाला पुन्हा पल्लवीताई रणके यांचे नेतृत्व; फेरनियुक्तीबद्दल अभिनंदन ठराव मंजूर किरण धायले मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) म...
किरण धायले मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुंबई:- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या VJNT विभागाच्या अध्यक्षपदी सौ. ॲड. पल्लवीताई रणके यांची फेरनियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. या निर्णयाबद्दल पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत पुढील कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
या फेरनियुक्तीबाबत आयोजित झूम मीटिंगद्वारे कार्यक्रम पार पडला. बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री हर्षवर्धनभाऊ सपकाळ यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन व आभार मानले. तसेच आगामी काळातील संघटनात्मक बांधणी, VJNT समाजाच्या प्रश्नांवरील भूमिका आणि पक्षविस्ताराबाबत सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
कार्यक्रमास VJNT विभागाचे कार्याध्यक्ष मा. श्री बादलजी गायकवाड, महासचिव श्री सुधाकर बडगुजर, सरचिटणीस, प्रदेश सचिव अनिल वाडीले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, सर्व जिल्हाध्यक्ष, सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थितांनी ॲड. पल्लवीताई रणके यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आगामी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

No comments