adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

*खडसे महाविद्यालयात भव्य महिला मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन*

 *खडसे महाविद्यालयात भव्य महिला मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन*   मुक्ताईनगर प्रतिनिधी :-  (संपादक :- हेमकांत गायकवाड) मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन...

 *खडसे महाविद्यालयात भव्य महिला मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन*



 मुक्ताईनगर प्रतिनिधी :- 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर यांच्या वतीने 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व क्रीडा विभाग यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे. आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार व प्रचार, फिटनेस ची जाणीव आणि युवक युवतींमध्ये क्रीडा भावना वाढविण्यासाठी या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे .परिसरातील सर्व विद्यार्थिनीं,युवतीं व महिलांनी उत्साहाने सहभागी व्हावे असे आयोजन समितीकडून आवाहन करण्यात येत आहे. स्पर्धेतील विजेत्यांना 3001 , 2001, 1001 अनुक्रमे प्रथम ,द्वितीय आणि तृतीय असे बक्षीसे दोन गटांसाठी (30वर्षा खालील व दुसरा गट 30वर्षावरील वयोगटासाठी ठेवण्यात आलेले आहे. तसेच प्रत्येकी सहभागी स्पर्धकांना इ- प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदर स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून संस्थेच्या अध्यक्षा मा. एडवोकेट रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या हस्ते होणार आहे. सदर स्पर्धेला प्रायोजक म्हणून शिव इन्वेस्टमेंट -भुसावळ ,पूजा साडी -मुक्ताईनगर, अंजली मेडिकल -मुक्ताईनगर यांनी विशेष सहकार्य केले. झालं.स्पर्धेचा तपशील खालील प्रमाणे:- स्पर्धा दिनांक 8 मार्च 2026,

वेळ :-सकाळी 7.00वाजता. स्थळ :-गोदावरी मंगल कार्यालय मुक्ताईनगर

मार्ग:- गोदावरी मंगल कार्यालय- परिवर्तन चौक -बस स्टॅन्ड- बोदवड चौफुली- आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल मार्गे खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर

   स्पर्धा यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एच. ए.महाजन , उपप्राचार्य डॉ. वंदना चौधरी ,डॉ.संजीव साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समित्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी काम पाहत आहे..

No comments