adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

*जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन..*

 * जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन कोळी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम.. *जळगाव (...

 *जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन कोळी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम..




*जळगाव (प्रतिनिधी) :-*

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


 जिल्ह्यातील आदिवासी कोळी लोकांच्या विवाहेच्छुंंक उपवर-वधूंसाठी सालाबादप्रमाणे ह्यावर्षीही कोळी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने ११ मे २०२६ रोजी जळगाव येथील सरदार वल्लभभाई पटेल मंगल कार्यालय येथे मोफत सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. याबाबत नुकतीच प्रतिष्ठानची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जळगावचे माजी नगराध्यक्ष चत्रभुज सोनवणे व मार्गदर्शक जगन्नाथ बाविस्कर (संपर्कप्रमुख - कोळी मंडळ,चोपडा) यांची उपस्थिती होती. मागील तीन वर्षांपासून दरवर्षी मे महिन्यात हा सामूहिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात व उत्साहात संपन्न होत असतो. याआधी पन्नास पेक्षाही जास्त उपवर वधूंचे विवाह प्रतिष्ठानतर्फे मोफत लावण्यात आलेले आहेत. सर्व स्तरातील दानशूर व्यक्ती व संस्था संघटनांच्या सहकार्याने हा विवाह सोहळा संपन्न होत असतो. यासाठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी चार सहा महिन्यांपासून अहोरात्र मेहनत घेत असतात. ह्या विवाह सोहळ्यात सर्व स्तरातील सामाजिक राजकीय नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शासकीय निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, समाजसेवक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते.

         विवाह नोंदणीसाठी वधू-वरांचे लिव्हिंग सर्टिफिकेट, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो व दोन्ही परिवारांचे संमती पत्र आवश्यक असते. वधू-वरांना लग्नड्रेस, बूट-चप्पलसह संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात येतात. वधू-वरांची एकत्र वरात व भव्य शोभायात्रा मिरवणूक काढण्यात येते. लग्न सोहळा शुभमुहूर्तावरच लावण्यात येतो. लग्नप्रसंगी भव्य स्टेज, गेट, मंडप, व्यासपीठ, वाजंत्री, भोजन व इतर आवश्यक सुविधा पुरविण्यात येतात. विवाह नोंदणी संस्थेचे श्री शनि मंदिरासमोरील कार्यालयात ३० एप्रिल २०२६ पर्यंत करण्यात येणार आहे. गरजु कोळीजमात बांधवांनी ह्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेले आहे.

        यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी कोळी, उपाध्यक्ष संजय बाविस्कर, सचिव अनिल कोळी, जेष्ठ सल्लागार गोकुळ सूर्यवंशी, संघटक आनंद सपकाळे, सहसचिव अक्षय सोनवणे, खजिनदार सुधाकर बाविस्कर, सहखजिनदार दीपक कोळी, प्रचार व प्रसिद्धी प्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे, गणेश बाविस्कर, सदस्य भिकन नन्नवरे, शिवाजी सूर्यवंशी, रतन बिऱ्हाडे, सतीश कोळी फौजी, नरेंद्र सपकाळे, निश्चलदास साळुंखे हे विशेष प्रयत्न करित आहेत...

No comments