adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विद्या नगरी ज्येष्ठ नागरिक संघाची साप्ताहिक बैठक अध्यक्ष इंजि.विजय हिलाल मंडळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली...

विद्या नगरी ज्येष्ठ नागरिक संघाची साप्ताहिक बैठक अध्यक्ष इंजि.विजय हिलाल मंडळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली... जळगाव जिल्हा प्रतिनिधी:-...

विद्या नगरी ज्येष्ठ नागरिक संघाची साप्ताहिक बैठक अध्यक्ष इंजि.विजय हिलाल मंडळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली...



जळगाव जिल्हा प्रतिनिधी:-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


विद्या नगरी ज्येष्ठ नागरिक संघाची साप्ताहिक बैठक अध्यक्ष इंजि.विजय हिलाल मंडळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या सभेत प्रार्थना , श्रध्दांजली अर्पण करून प्राचार्य भगवान पाटील यांनी आपल्या भाषणात होलीत्सोव का आणि कसा साजरा करण्यात येतो याविषयी माहिती दिली.त्यानंतर  मराठीतील विरामचिन्हे,भाषेचे सौंदर्य याविषयी सविस्तर माहिती देताना सांगितले की मराठीत विरामचिन्हे कुठे, कधी, कशी हे अचूकपणे सांगणारी पहिली नियमावली, विरामचिन्हाची परिभाषा ही छोटी पुस्तिका लिहून प्रकाशित करणारे ज्यांना महाराष्ट्रभाषागुरू म्हणून ओळखले जाते ते थॉमस कॅन्डी यांची २६ फेब्रुवारी २०२६ पासून १५०वे स्मृती वर्ष सुरू होत आहे.त्यानिमित्ताने त्यांचे स्मरण करायला हवे म्हणून २६फेब्रुवारी  हा विरामचिन्हे दिवस साजरा करण्यात यावा असे आवाहन केले आहे. त्यांनी प्रथमच मराठी भाषेत पांच विरामचिन्हे घेतली आहेत.१) स्वल्पविरामचिन्ह (,)२) अर्धविरामचिन्ह (;)३) पूर्ण विरामचिन्हे (.) ४) प्रश्नचिन्ह (?) ५) उद्गार चिन्ह (!) आणि अवतरण चिन्ह  

   आपल्या मराठी भाषेत प्रामुख्याने संत पंत आणि तंत या तीन प्रकारातील लेखन करीत होते.महानुभाव वाॾ:मयात गद्य साहित्य होते . विरामचिन्हे वापरली जात नव्हती. थॉमस कॅन्डी हे भारतात आले त्यांनी सैनिकी शिक्षण झाल्यावर ते मॉल्थसवर्थ यांच्या सोबत शब्दकोश तयार करण्यात मदत करत होते.इंग्रजी, फ्रेंच भाषेत ज्याप्रमाणे विरामचिन्हे वापरता तशी मराठी भाषेत विरामचिन्हे वापरली जात नव्हती.हे लक्षात आल्यावर त्यांनी मराठी साहित्यातील नामांकित साहित्यिकांना भाषेचं सौंदर्य वाढविण्यासाठी विरामचिन्हे वापरता आली पाहिजे म्हणून त्यांनी प्रथमच पुस्तिका लिहून प्रकाशित केली.महत्व पाठविले.म्हणून त्यांना महाराष्ट्र भाषागुरू संबोधले.त्यांनी ही पुस्तिका १८५०  छापली त्याघटनसही १७५ वर्षे झाली.  विरामचिन्हे कुठे कधी व कशी वापरावीत हे त्यांनी उदाहरणासह पटवून दिले.अशी सविस्तर माहिती देण्यात आली.विध्यानगरी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभेत २६ फेब्रुवारी हा दिवस विरामचिन्हे दिवस साजरा करण्यात यावा असा ठराव मंजूर करण्यात आला.सर्वानुमते मंजूर करण्यात आला. अध्यक्ष इंजि.विजय मंडळे यांनी आभार मानले व ठराव महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यात येईल.असे सांगितले.

सचिव सुभाष पाटील यांनी सुत्रसंचलन केले,सर्व उपस्थितांचे आभार मानले पसायदानाने सभा संपन्न झाली...

No comments