adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महानगरपालिकेच्या आरक्षित सांडपाणी जागेवर गवत चोरी.... सामाजिक कार्यकर्ती रूचिताताई नाईक यांची कारवाई ची मागणी...

 महानगरपालिकेच्या आरक्षित सांडपाणी (wait land) जागेवर गवत चोरी.... सामाजिक कार्यकर्ती रूचिताताई नाईक यांची कारवाई ची मागणी...   अमोल बावस्का...

 महानगरपालिकेच्या आरक्षित सांडपाणी (wait land) जागेवर गवत चोरी....

सामाजिक कार्यकर्ती रूचिताताई नाईक यांची कारवाई ची मागणी...  


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

नालसोपारा ता, ११ :- नालासोपारा पश्चिम समेळपाडा येथिल महानगरपालिकेच्या आरक्षित सांडपाणी (wait land) जागेवरील रोज लाखो टन गवत चोरी करत असुन हे गवत गुजरात व महाराष्ट्र राज्यातील मोठ मोठ्या तबेल्यांमध्ये अनेक ठिकाणी लाखो रूपयांना याची विक्री करून या गवताची चोरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या आरक्षित जागेवरिल सकाळी ६ वाजल्यापासून १२वाजेपर्यंत गवत काढणाऱ्या कामगारांना दिवसा एक हजार ते दिड हजार रोजदांरी देऊन हे काम केले जाते मोठ मोठे ट्रक भरून हे पाच ते दहा रूपये किलो प्रमाणे लाखो टन गवत विक्री केली जाते.

या आरक्षित जागेवर गवत कापल्यावर लगेच वाढीसाठी पाण्याची व गवत वाढवण्याची सुविधा हि करण्यात आली आहे. यामध्ये महानगरपालिकेच्या अधिकारी व नालासोपारातील प्रतिष्ठीत व्यक्तींची नावे समोर आली असुन यामध्ये सखोल चौकशी करून त्वरित कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ती रूचिताताई नाईक यांनी केली आहे.

No comments