🚨*“नोटीसांचा पाऊस; पुढची कारवाई आणखी कठोर!” — चोपडा नगरपरिषदेची घरोघरी मोहीम सुरू* चोपडा प्रतिनिधी (संपादक :- हेमकांत गायकवाड) २ हजारांहून...
🚨*“नोटीसांचा पाऊस; पुढची कारवाई आणखी कठोर!” — चोपडा नगरपरिषदेची घरोघरी मोहीम सुरू*
चोपडा प्रतिनिधी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
२ हजारांहून अधिक नोटीसांचे वाटप; अवैध नळ कनेक्शनधारकांनाही इशारा
चोपडा नगरपरिषदेने थकबाकी वसुलीसाठी सुरू केलेली धडक मोहीम आता आणखी तीव्र करण्यात आली असून शहरात घरोघरी नोटीस बजावण्याचे अभियान सुरू करण्यात आले आहे. मागील आठवड्यात नगरपरिषद प्रशासनाने थकबाकीदारांविरुद्ध नळ कनेक्शन कट करणे व नगरपरिषदेच्या गाळ्यांना सील लावणे अशा कठोर कारवाया केल्या होत्या. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती आणि अनेक थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर आता नगरपरिषदेच्या वसुली पथकांकडून शहरातील प्रत्येक मालमत्ता धारक, नळ कनेक्शन धारक तसेच अवैध नळ कनेक्शनधारकांना नोटीस बजावण्याची कारवाई मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
सध्या पर्यंत शहरात सुमारे २००० नोटीसांचे वाटप करण्यात आले असून अजूनही ही प्रक्रिया सुरू आहे. वसुली पथके विविध प्रभागांमध्ये जाऊन नागरिकांना प्रत्यक्ष भेट देऊन नोटीस देत आहेत.
⚠️ नोटीसनंतर थेट कारवाई
नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नोटीस मिळाल्यानंतर ठरावीक मुदतीत मालमत्ता कर, पाणीपट्टी किंवा अन्य थकबाकी भरली नाही तर संबंधितांविरुद्ध थेट कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
त्यामध्ये —
नळ कनेक्शन तात्काळ बंद करणे
अवैध नळ कनेक्शन जप्त करणे
मालमत्तेवर बोजा बसविणे
जप्तीची कारवाई
गाळे/दुकानांना सील करणे
कायदेशीर कारवाई
अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत.
💧 अवैध नळ कनेक्शनधारकांसाठी अंतिम इशारा
शहरात अनेक ठिकाणी अवैध नळ कनेक्शन असल्याचे नगरपरिषदेच्या निदर्शनास आले आहे. अशा कनेक्शनधारकांनी तात्काळ नगरपरिषद कार्यालयाशी संपर्क साधून आपले नळ कनेक्शन वैध करून घ्यावे, अन्यथा अचानक तपासणी करून कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
🔴 “नोटीस आज… कारवाई उद्या!”
नगरपरिषद प्रशासनाच्या या मोहिमेमुळे शहरातील थकबाकीदारांमध्ये पुन्हा एकदा धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठवड्यातील सील व नळ कनेक्शन कट कारवाईनंतर अनेक नागरिकांनी स्वतः नगरपरिषदेत येऊन थकबाकी भरण्यास सुरुवात केली आहे.
नगरपरिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, नोटीस वाटप पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्यात मोठ्या प्रमाणावर थेट कारवाईचे सत्र सुरू होणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी तातडीने थकबाकी भरून तसेच अवैध नळ कनेक्शन वैध करून घेऊन कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे...





No comments