भौगोलिक परिस्थिती पाहून आश्रमशाळा सकाळच्या सत्रात भरवण्याबाबत आयुक्तांचे निर्देश जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मार्च महिन्य...
भौगोलिक परिस्थिती पाहून आश्रमशाळा सकाळच्या सत्रात भरवण्याबाबत आयुक्तांचे निर्देश
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाची तीव्रता अधिक वाढल्याने महाराष्ट्र राज्यातील आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभाग आयुक्तालय महाराष्ट्र राज्य,नाशिक आयुक्त लीना बनसोड यांच्या पत्रानुसार महाराष्ट्रातील चारही विभागाअंतर्गत येणाऱ्या नाशिक,ठाणे,अमरावती,नागपूर विभागातील अप्पर आयुक्त यांना विविध शासकीय व अनुदानित आश्रमशाळांसाठी भौगोलिक परिस्थितीच्या अंदाज घेऊन आदिवासी आश्रमशाळा सकाळच्या सत्रात भरवल्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.उन्हाची तीव्रता अधिक वाढल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये या हेतूने सदर आदेश निर्गमित झाल्याचे कळविण्यात आलेले आहे.दरम्यान विविध विभागामधील अनेक प्रकल्प कार्यालयातील प्रकल्प अधिकारी भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेऊन काय निर्णय घेतात?याकडे आदिवासी पालक,विद्यार्थी यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान १५ तारखेपर्यंत महाराष्ट्र राज्यातील विदर्भ,उत्तर महाराष्ट्र तसेच इतर भागात उष्णतेची लाट येण्याचे संकेत तज्ञांनी व्यक्त केलेले आहेत.

No comments