‘सीए’ परीक्षेत कु. प्रणाली पाटील (महाले) यशस्वी विचखेडा गावाचा अभिमान; प्रथम प्रयत्नात घवघवीत यश चंद्रकांत पाटील विचखेडा (संपादक -:- हेमका...
‘सीए’ परीक्षेत कु. प्रणाली पाटील (महाले) यशस्वी
विचखेडा गावाचा अभिमान; प्रथम प्रयत्नात घवघवीत यश
चंद्रकांत पाटील विचखेडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सन २०२६ च्या ‘सीए’ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, विचखेडा (सध्या मुक्काम Pune) येथील कु. प्रणाली प्रभाकर पाटील (महाले) हिने प्रथम प्रयत्नात चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या यशामुळे विचखेडा गावासह महाले-पाटील परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रणालीचे वडील श्री. प्रभाकर पाटील यांनी संसार उभा करण्यासाठी मोठी मेहनत घेतली. पुण्यात आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला एका साध्या कंपनीत नोकरी केली; मात्र परिस्थितीशी झुंज देत त्यांनी नंतर छोटा व्यवसाय सुरू केला. पानटपरीसारख्या छोट्या व्यवसायातून कुटुंबाचा गाडा हाकताना त्यांनी मुलांच्या शिक्षणावर विशेष भर दिला. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची कास धरल्यामुळेच आज त्यांच्या दोन्ही मुलांनी यशाचे शिखर गाठले आहे.
प्रणालीचा भाऊ सध्या नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून कार्यरत असून चांगल्या वेतनावर काम करत आहे. आता मुलगीही ‘सीए’ होऊन कुटुंबाचा मान उंचावला आहे. ही बाब केवळ परिवारासाठीच नव्हे, तर संपूर्ण गावासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी ठरली आहे. पुण्यासारख्या महागड्या शहरात राहून मुलांना उच्च शिक्षण देणे आणि त्यांना या स्तरापर्यंत पोहोचवणे हे मोठे आव्हान असते. मात्र जिद्द, कष्ट आणि शिक्षणावरील निष्ठा यांच्या बळावर प्रभाकर पाटील यांनी हे स्वप्न सत्यात उतरवून दाखवले आहे. कु. प्रणाली प्रभाकर पाटील हिचे या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.


No comments