adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हातेड सह भारडू येथे शेतकरी शेती कामात व्यस्त

   हातेड सह भारडू येथे शेतकरी शेती कामात व्यस्त शामसुंदर सोनवणे वि.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) हातेड / भारडू:-  ग्रामीण भागात सध्या शे...

  हातेड सह भारडू येथे शेतकरी शेती कामात व्यस्त


शामसुंदर सोनवणे वि.प्र.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

हातेड / भारडू:-  ग्रामीण भागात सध्या शेतीच्या कामांना चांगलाच वेग आला असून हातेड खुर्द व भारडू परिसरातील शेतकरी मोठ्या उत्साहाने शेतातील विविध कामांमध्ये गुंतलेले दिसत आहेत. आगामी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी पेरणीपूर्व मशागत, नांगरणी, कुळवणी तसेच शेती स्वच्छतेची कामे हाती घेतली आहेत. सकाळपासून दुपारपर्यंत शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतात राबताना दिसत असून शेतांमध्ये कामांची लगबग वाढलेली आहे. काही ठिकाणी बैलजोडीच्या सहाय्याने पारंपरिक पद्धतीने कामे सुरू आहेत, तर अनेक शेतकरी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून वेळ आणि श्रमाची बचत करत आहेत. दरम्यान, शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळेच परिसरातील आर्थिक चक्र गतिमान राहत असते. मात्र, यंदाच्या हंगामात पिकांना मागील वर्षाच्या तुलनेत कमी भाव मिळाल्याची खंतही काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. भारडू येथील संदिप सोनवणे (पप्पू दादा) यांनीही हीच भावना मांडत शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. अशा परिस्थितीतही शेतकरी नव्या हंगामाकडे आशेने पाहत असून आगामी हंगाम भरघोस जावो, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

No comments