adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

थेपडे विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

 थेपडे विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी  ​जळगाव जिल्हा (प्रतिनिधी): समाधान पाटील  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...

 थेपडे विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी 


​जळगाव जिल्हा (प्रतिनिधी): समाधान पाटील 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

स्वा. सै. पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. महामानवाच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

​कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हे पूजन विद्यालयाचे प्राचार्य श्री. जी. डी. बच्छाव, उपप्राचार्य श्री. एस. के. भंगाळे आणि पर्यवेक्षक श्री. के. पी. पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शिक्षक प्रतिनिधी श्री. सचिन चव्हाण, ज्येष्ठ शिक्षक श्री. एस. एम. नेतकर, श्री. एस. सी. बाविस्कर, ज्येष्ठ शिक्षिका सौ. अनिता नेवे मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून बाबासाहेबांच्या कार्याचा व संविधानाचा गौरव केला.

​शाळेतील प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर सर्व उपस्थितांनी म्हसावद गावातील मुख्य चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भेट दिली. तेथे पुतळ्याचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून बाबासाहेबांच्या जयघोषात त्यांना विनम्र अभिवादन केले. अशा प्रकारे शाळा आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त उत्साहात हा जयंती सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.

No comments