adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उल्लेखनीय समाजसेवेसाठी विजय खर्चे यांना ‘राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान

 उल्लेखनीय समाजसेवेसाठी विजय खर्चे यांना ‘राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान   जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सेवानिवृत्त पोलीस उप नि...

 उल्लेखनीय समाजसेवेसाठी विजय खर्चे यांना ‘राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान  


जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सेवानिवृत्त पोलीस उप निरीक्षक श्री.विजय वासुदेव खर्चे  (राष्ट्रपती पोलीस पदक ने सन्मानित )यांना पद्मश्री डॉक्टर मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार 2026 प्रदान करून गौरविण्यात आले. डॉक्टर मणीभाई देसाई प्रतिष्ठान (नीती आयोग भारत सरकार, मिनिस्ट्री ऑफ एम एस एम इ उद्याम मंत्रालय संलग्नित व पूजनीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आरंभीत नीती आयोग भारत सरकार संलग्नित व राष्ट्रसेवा समिती महाराष्ट्र राज्यवतीने उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. हरविलेल्या अल्पवयीन मुली व स्त्रिया यांचा शोध घेतलेला आहे सामाजिक या सर्व समाजसेवेतील योगदानाची दखल घेत सदर पुरस्कार संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक ह.भ.प हिंदू रत्न डॉक्टर रवींद्र भोळे सर व खादी आणि ग्रामोद्योग मंत्री माननीय रवींद्र साठे सर व इतर वरिष्ठ मान्यवरांचे हस्ते 27 एप्रिल ला सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह पुणे येथे सन्मान पत्र, शाल मोमोंटो,प्रदान करून गौरविण्यात आले.समाज कार्य करताना त्यांना त्यांच्या परिवाराचा, समाजाचा नेहमीच पाठिंबा मिळतो. पत्नी सौ.मंदा विजय खर्चे, मुलगा विवेक, सून सौ. पूजा, मुलगा पराग खर्चे तसेच भातृ मंडळ अकोला समाज बांधव आणि पोलीस,मित्र परिवार , अकोला यांचे नेहमी योगदान व सहकार्य मिळत असते. त्यांना हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्या सर्वांचे धन्यवाद मानतात.

No comments