आरोग्यदायी भविष्यासाठी लासूर गावात एच पी व्ही जनजागृती अभियान” लासूर ता.चोपडा प्रतिनिधी :- (संपादक :- हेमकांत गायकवाड) लासूर (ता. चो...
आरोग्यदायी भविष्यासाठी लासूर गावात एच पी व्ही जनजागृती अभियान”
लासूर ता.चोपडा प्रतिनिधी :-
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
लासूर (ता. चोपडा):- आरोग्य विभाग चोपडा, सुनंदन बहुउद्देशीय संस्था, चोपडा, Jhpiego संस्था जळगाव आणि भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय यांचा संयुक्त विद्यमाने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र लासूर येथे एचपीव्ही (HPV) लसीकरण जनजागृती अभियानांतर्गत आज महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत गावात जनजागृती रॅली उत्साहात काढण्यात आली.
या रॅलीमध्ये महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थी, आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीद्वारे किशोरवयीन मुलींच्या आरोग्य संरक्षणासाठी HPV लसीकरणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आले.
यानंतर आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना HPV लसीकरणामुळे भविष्यात होणाऱ्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळू शकते, असे सांगितले. यावेळी मेडिकल ऑफिसर डॉ. प्रियंका तांबे, तसेचJhpiego या संस्थेच्या आम्रपाली मॅडम व ज्ञानेश्वर सोनवणे,आरोग्य सहाय्यिका एल.बी. अलकारी,आरोग्य सहाय्यक एस. टी. पाटील, आरोग्य सेविका संगीता भादले, गतप्रवर्तक सरला माळी व शैला राजपूत तसेच सर्व आशा सेविका व आरोग्य कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
ग्रामपंचायत स्तरावरूनही या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी ग्रामसेवक रमेश देवरे, सरपंच मॅडम व प्रतिनिधी अनिल बापू तसेच ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आर एस पाटील व पर्यवेक्षक एस जी पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
या जनजागृती अभियानामुळे गावातील नागरिकांमध्ये HPV लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण झाली असून किशोरवयीन मुलींनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मान्यवरांनी केले..

No comments