adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कूलचा १०० टक्के निकाल परंपरा कायम

 डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कूलचा १०० टक्के निकाल परंपरा कायम  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  येथील डॉ. उल्हास पाटील सीबी...

 डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कूलचा १०० टक्के निकाल परंपरा कायम 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 येथील डॉ. उल्हास पाटील सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूलने यंदाही शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे शाळेचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे. यावर्षीच्या निकालात दिव्यांशु पाटील याने ९६.८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. प्रांजल पाटील हिने ९४.२ टक्के गुणांसह द्वितीय स्थान मिळवले. तसेच गौरव नेहते (९३.६%), रूद्र पाटील (९३.२%), स्वरीत पाटील (९३%), जिज्ञासा भारंबे (९२.८%), श्रावणी भोगे (९१.४%) आणि महिन पिंजारी (९०.२%) यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, संचालिका डॉ. वर्षा पाटील, सचिव डॉ. केतकी पाटील, हृदयरोगतज्ञ डॉ. वैभव पाटील तसेच प्राचार्या भारती महाजन यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments