“निरोगी जीवनशैलीचा संदेश; खडसे महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिन साजरा” मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : - (संपादक :- हेमकांत गायकवाड) मुक्ताईनगर ता...
“निरोगी जीवनशैलीचा संदेश; खडसे महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिन साजरा”
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : -
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. रंजना गोरे उपस्थित होत्या. त्यांनी संतुलित आहार, नियमित व्यायाम, मानसिक स्वास्थ्य आणि तणावमुक्त जीवनशैली यांचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच विद्यार्थिनींना आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहन केले.
यावेळी क्रीडा संचालक प्रा. प्रतिभा ढाके उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. एच. ए. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शेवटी विद्यार्थिनींनी निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा संकल्प केला..

No comments