adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मुंडगाव येथे १० एप्रिल रोजी ‘शेतकरी व कृषी केंद्र संचालक सन्मान सोहळ्याचे आयोजन

  मुंडगाव येथे १० एप्रिल रोजी ‘शेतकरी व कृषी केंद्र संचालक सन्मान सोहळ्याचे आयोजन  शामसुंदर सोनवणे विशेष प्रतिनिधी:- (संपादक :- हेमकांत गायक...

 मुंडगाव येथे १० एप्रिल रोजी ‘शेतकरी व कृषी केंद्र संचालक सन्मान सोहळ्याचे आयोजन


 शामसुंदर सोनवणे विशेष प्रतिनिधी:-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


 शेतकरी आणि कृषी केंद्र संचालक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्यासाठी आणि कृषी क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी येत्या शुक्रवार, १० एप्रिल २०२६ रोजी एका विशेष 'स्नेहसंमेलन व सन्मान सोहळ्या'चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मुंडगाव येथील नवीन बस स्टँड परिसरातील श्री संत गजानन महाराज सभागृहात संपन्न होत असुन या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शेतकरी नेते गजानन बंगाळे पाटील, स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर उपस्थित राहणार आहेत. कृषी केंद्र चालकांवर होणारी प्रशासकीय सक्ती आणि अन्यायकारक कारवाईच्या विरोधात स्वराज्य पक्ष आता खंबीरपणे मैदानात उतरणार आहे. निविष्ठा विक्रीत येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि अधिकाऱ्यांकडून होणारा छळ खपवून घेतला जाणार नाही, "बळीराजाला बळ देणाऱ्या कृषी केंद्र चालकांचा सन्मान राखा," या भूमिकेतून स्वराज्य पक्ष लवकरच लढा उभारणार आहे. प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्यांवर अन्याय झाल्यास स्वराज्य स्टाईलने उत्तर दिले जाईल, या निर्धाराने प्रशांत डिक्कर यांनी पुढाकार घेतला आहे. अतिथी म्हणून श्री. भगवानराव पाटील आणि श्रीगणेश पाटील यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या भव्य सोहळ्याचे आयोजन स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी व मित्र परिवार ग्रुपने केले असून कृषी क्षेत्राचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना खत-बियाणे आणि योग्य मार्गदर्शनाद्वारे साथ देणाऱ्या केंद्र संचालकांचा सन्मान करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवराम डिक्कर यांनी केले आहे..

No comments