चोपड्यात गो अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:- गो सम्मान आवाहन अभियानाने प्रचंड आघाडी घेतल...
चोपड्यात गो अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:- गो सम्मान आवाहन अभियानाने प्रचंड आघाडी घेतली असून, चोपडा येथे विविध भागात गो सम्मान रॅली निघत आहेत. बैठकांचा दौर चालू असून बैठकीत गायीचे महत्व समजून दिले जात आहे. गाय वाचेल तर देश वाचेल यावर समजून दिले जात आहे. गायीला सेवा, सुरक्षा व सम्मान मिळावी म्हणून 27 एप्रिल हा दिवस गो सम्मान दिवस साजरा करण्याचा संकल्प लोक घेत आहेत. 27एप्रिल रोजी महात्मा गांधीजी चौकातून निघणाऱ्या गो सम्मान शोभा यात्रेत गो भक्त, शेतकरी, जनता मोठ्या संख्येने उपस्थित राहून भजन करत, जय गोमाता जय गोपाला असा जयघोष करत म तहसीलदार साहेब यांना प्रार्थना पत्र देऊन केंद्र व राज्य सरकारकडे गायीला राष्ट्रमाता या पदावर प्रतिष्ठित करा, संपूर्ण देशात गो हत्या बंदीचा एकच कडक कायदा लागू करा, गायीला पुरेशी सेवा पुरावा अशा मागाण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. गाय वाचेल तर देश वाचेल या विचारावर विचारवंत ठाम आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील, शेतकरी नेते एस बी पाटील, ऍड निर्मलजी देशमुख, समाज सेवक के डी चौधरी यांनी आपले विचार बोलून दाखवले. सुंदरगढी, मल्हारपुरा, संजीवनी नगर या भागात रॅली काढून गो माता राष्ट्रमाता, गाय बचेंगी देश बचेंगा अशा घोषणा देत 27एप्रिल रोजी गो सम्मान अभियानात शोभा यात्रेत सहभागी होण्याचे आव्हाहन केले. याकामी के डी चौधरी, सतीश पाटील, देवकांत के चौधरी, लखन तेली, राजेंद्र चौधरी, मोरे अप्पा, गौरव पाटील, जयदेव देशमुख, व्ही डी पाटील, गोकुळ चौधरी, आदिनी परिश्रम घेतले.

No comments