adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गजराजनगरमध्ये बनावट सुगंधी तंबाखूचा कारखाना उध्वस्त तिघे अटकेत १३ लाखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

 गजराजनगरमध्ये बनावट सुगंधी तंबाखूचा कारखाना उध्वस्त तिघे अटकेत १३  लाखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई  सचिन मोकळं अहि...

 गजराजनगरमध्ये बनावट सुगंधी तंबाखूचा कारखाना उध्वस्त तिघे अटकेत १३  लाखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-  जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी दिले होते.या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येथील गजराजनगर येथे छापा टाकून बनावट सुगंधित तंबाखू तयार करण्याचा मोठा कारखाना उध्वस्त केला आहे.या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून १३,९२,१९० रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक १८ एप्रिल २०२६ रोजी शहरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,आसिफ खुदाबक्ष तांबोळी हा आपल्या साथीदारांसह गजराजनगर येथील कालीमाता मंदिराजवळ राहत्या घरात साध्या तंबाखूपासून शरीरास अपायकारक सुगंधी तंबाखू तयार करण्याचा बेकायदेशीर कारखाना चालवत आहे.

पोलीस पथकाने तात्काळ अन्न सुरक्षा अधिकारी श्री.राजेश बडे यांना पाचारण केले आणि संयुक्तपणे छापा टाकला.यावेळी तीन इसम प्रत्यक्ष तंबाखू तयार करताना रंगेहाथ मिळून आले.

अटक केलेले आरोपी

१) आसिफ खुदाबक्ष तांबोळी (वय ५०, रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर)

२) जफर चाँद शेख (वय ३८, रा. बडी मस्जिदजवळ, मुकुंदनगर, अहिल्यानगर)

३) दाऊद बाबुमियाँ शेख (वय ४२, रा. सदर बाजार भिंगार, अहिल्यानगर)

जप्त केलेला मुद्देमाल (किंमत १३,९२,१९०/-)

कारखान्यात रसायने,रंग आणि इतर घटक वापरून बनावट सुगंधी तंबाखू आणि पानामध्ये टाकण्याचा 'किवाम' तयार केला जात होता. पोलिसांनी खालील साहित्य जप्त केले:

६०० किलो सुगंधित तंबाखू आणि ९० हजार रुपयांचा बनावट किवाम.

३ मिक्सर, ३ सिलिंग मशीन, एअर कॉम्प्रेसर, वजनकाटा आणि ६ इलेक्ट्रिक मोटारी.

१५ किलो कलर, चुना, पॅराफिन रसायन, बनावट स्टिकर्स आणि पिशव्यांचे रोल.

टाटा सफारी गाडी (क्र. एम.एच. १७ व्ही. ७००).

गुन्हा दाखल

पोलीस अंमलदार सुनील विनायक पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात (गु.र.नं. २५५/२०२६) भारतीय न्याय संहिता २०२३ आणि अन्न सुरक्षा मानके अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एम.आय.डी.सी. पोलीस करत आहेत.ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, पोउपनि राजेंद्र वाघ,अंमलदार सुनील पवार,गणेश धोत्रे,शाहिद शेख,बिरप्पा करमल,संतोष खैरे, शिवाजी कावडे,अरविंद भिंगारदिवे,उमाकांत गावडे आणि महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांच्या पथकाने केली आहे.

No comments