adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,नगरसेवक यांच्याकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पाहणी.

 चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,नगरसेवक यांच्याकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पाहणी.  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमक...

 चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,नगरसेवक यांच्याकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पाहणी. 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा- १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पाहणी करण्यात आली.भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व आजूबाजूच्या परिसराला रंग रंगोटी करण्यात येत असून परिसराचे सुशोभीकरण करण्याचे कार्य सुरू आहे. येणाऱ्या १४ एप्रिल रोजी मिरवणुकीचा रूट बघून संभाव्य समस्यांचे निराकरण चोपडा नगरपालिकाचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर व सत्ताधारी नगरसेवक यांनी केले. 


   या पाहणी दरम्यान मुख्याधिकारी रामनिवास झंवर,नगरसेवक रमेश शिंदे,किशोर चौधरी, रमाकांत ठाकूर,माजी नगरसेवक अशोक बाविस्कर,नगरसेविका सौ.वंदना बाविस्कर, दीपक भगवंतराव पाटील,नगरसेवक ईश्वर अलकरी, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर बाविस्कर, समाजसेवक समाधान  सपकाळे, उद्योजक रविंद्र बळीराम पाटील, शिवसेना कार्यकर्ते तथा पत्रकार मिलिंद डी. सोनवणे,नगराध्यक्षा यांचे खाजगी स्वीय सहाय्यक निलेश जाधव, नगरपरिषदेचे अधिकारी श्री वाघ साहेब,श्री.भोंगे साहेब, यांच्यासह चोपडा शहरातील भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments