adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अमरावती जिल्हास्तरीय आर्म रेसलिंग स्पर्धेत माऊली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील करण खेते यांना सुवर्ण यश

  अमरावती जिल्हास्तरीय आर्म रेसलिंग स्पर्धेत माऊली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील करण खेते यांना सुवर्ण यश शेगाव प्रतिनिधी:- (संपादक :- हेमकांत ग...

 अमरावती जिल्हास्तरीय आर्म रेसलिंग स्पर्धेत माऊली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील करण खेते यांना सुवर्ण यश




शेगाव प्रतिनिधी:-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


शेगाव:- शहरातील माऊली कॉलेजमधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (द्वितीय वर्ष)चा विद्यार्थी करण गजानन खेते याने आर्म रेसलिंग स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावून त्याला सुवर्णपदक, 1000 रोख, प्रमाणपत्र असे उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या शानदार कामगिरीमुळे त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड देखील झाली आहे.

करणने आतापर्यंत एकूण 24 मेडल्स आणि 5 ट्रॉफीज जिंकून आपल्या क्रीडा कारकिर्दीत भक्कम स्थान निर्माण केले आहे. तसेच त्याने पावर लिफ्टिंग स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करत क्रमांक मिळविला आहे.ही स्पर्धा अमरावती जिल्हा असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आली होती. करणच्या या यशामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत..

No comments