चोपड़ा येथे अखंड नाम जप यज्ञ सप्ताह चोपडा येथील यावल रस्त्यावरील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूण्य ...
चोपड़ा येथे अखंड नाम जप यज्ञ सप्ताह 
चोपडा येथील यावल रस्त्यावरील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूण्य तिथी सप्ताह निमित्त पारायणात बसलेले सेवेकरी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपड़ा:- येथील बजरंग नगरमधील स्वामी समर्थ केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूण्यतिथी सप्ताहास गुरुवार पासून मोठ्या भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला आहे
या पार्श्वभूमीवर श्री गुरु चरित्र पारायण सोहळ्यास सुरुवात करण्यात आली आहे एकुण चारशे सेवेकरी या पारायणात सहभागी झाले होते सेवेकऱ्यासाठी प्रहार सेवेचे नियोजन करण्यात आले होते महिला सेवेकऱ्याची प्रहार सेवा सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत व पुरुष सेवक-या ची प्रहार सेवा सायंकाळी 6 ते सकाळी 6 या वेळेत सुरू आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताहनिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे
दि १५ तारखेला सत्त दत्त पुजनाने सप्तहाची सांगता होणार असून त्या दिवशी साळे दहा वाजता नेवैद्य आरती नंतर स्वामीच्या महा निर्माणच्या दिवशी घडलेल्या घटनांचे व १८ विभागातील काही विभाघावर मार्गदर्शन होणार आहे सप्ताह पार पाडण्यासाठी सर्व सेवे कऱ्याचे सहकार्य लाभत आहे.
No comments