adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नरसापूर प्रकरण: आरोपीस फाशी द्या ! नव स्वराज्य सेनेची मागणी

 नरसापूर प्रकरण: आरोपीस फाशी द्या ! नव स्वराज्य सेनेची मागणी   श्रीरामपूर / प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  पुणे जिल्ह्याच्या भोर त...

 नरसापूर प्रकरण: आरोपीस फाशी द्या ! नव स्वराज्य सेनेची मागणी 


 श्रीरामपूर / प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील नरसापूर याठिकाणी साडेतीन वर्षांच्या निरागस चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण समाजात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेच्या निषेधार्थ नव स्वराज्य सेनेच्या वतीने पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन श्रीरामपूर यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी बोलताना नव स्वराज्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. विजयराव खाजेकर यांनी सांगितले की, “एका निरागस बालिकेवर अत्याचार करून तिचा जीव घेणे हा अत्यंत गंभीर गुन्हा असून माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना आहे. अशा घटनांमुळे महिला व बालकांच्या सुरक्षेबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे.”

नवस्वराज्य सेनेच्या वतीने सदरील प्रकरणातील आरोपीस लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली तसेच ही केस नियमित न्यायालयात न चालवता जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालयात चालवण्यात यावी, जेणेकरून पीडित कुटुंबास तात्काळ न्याय मिळेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय पीडित कुटुंबाला तातडीने आवश्यक आर्थिक व कायदेशीर मदत देण्यात यावी तसेच प्रशासनाने या गंभीर घटनेची दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

निवेदन देताना संजय वाहूळ (उपाध्यक्ष), संपत मोरे ( विभागीय अध्यक्ष), कल्याणी भालेराव (महिला अध्यक्ष), डॉ. पंडितराव पगारे ( विभागीय अध्यक्ष), दत्तू शिवसाट (तालुका संपर्क प्रमुख), तय्यब भाई पठाण (तालुका संपर्क प्रमुख), गौतम कामळे (कार्यकर्ते), बाळासाहेब बागुल (लहुजी सेना राष्ट्रीय  अध्यक्ष),  हनीफ भाई पठाण (लहुजी सेना राष्ट्रीय सचिव), आशोकराव शेळके (तालुका उपाध्यक्ष), भोंगळे सर (प्रदेश महासचिव), सविता ताई रणदिवे (विभागीय अध्यक्ष)  समीना शेख ( संपर्कप्रमुख) आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments