adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अहिल्यानगरमध्ये खळबळ..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट..दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!

 अहिल्यानगरमध्ये खळबळ..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट..दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -...

 अहिल्यानगरमध्ये खळबळ..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट..दोघांविरुद्ध गुन्हा दाखल! 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सोशल मीडियावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह टीका करणे दोन जणांना चांगलेच महागात पडले आहे. राजकीय द्वेषातून बदनामी करण्याचे कारस्थान रचल्याचा ठपका ठेवत,संगमनेर शहर पोलिसांनी एका व्हॉट्सॲप ग्रुपचा ॲडमिन आणि संबंधित पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या कारवाईमुळे सोशल मीडियावर बेताल वक्तव्य करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार,भाजपच्या शहराध्यक्ष पायल ताजणे या पक्षाच्या शहर कार्यालयात कार्यकर्त्यांशी आगामी नियोजनाबाबत संवाद साधत होत्या.याच वेळी एका सतर्क कार्यकर्त्याने त्यांना फोन करून माहिती दिली की,‘जागो संगमनेरी..’ नावाच्या एका सोशल मीडिया ग्रुपवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात अत्यंत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक पोस्ट व्हायरल होत आहे.माहिती मिळताच ताजणे यांनी गांभीर्य ओळखून तात्काळ त्या पोस्टचे स्क्रीनशॉट मागवून घेतले.पोस्टमधील मजकूर हा केवळ टीका नसून एका राष्ट्रीय नेत्याची प्रतिमा मलीन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.राजकीय द्वेषापोटी अशा प्रकारची कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असा पवित्रा घेत पायल ताजणे यांनी भाजप कार्यकर्त्यांसह थेट संगमनेर पोलीस ठाणे गाठले. त्यांनी पोलिसांकडे संबंधित पुरावे सादर करून कडक कारवाईची मागणी केली."एका जबाबदार पदावर असलेल्या नेत्याची अशा प्रकारे बदनामी करणे हे लोकशाहीला घातक आहे.हे एक सुनियोजित कारस्थान असून पोलिसांनी याचा मुळापासून तपास करावा," अशी मागणी यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली.पायल ताजणे यांच्या तक्रारीवरून संगमनेर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत अमोल शेलकर (ॲडमिन, 'जागो संगमनेरी' ग्रुप),पोस्ट प्रसिद्ध करणारा संबंधित सदस्य अशा दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे:

No comments