adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्रवण दत्त. एस यांची अखेर बदली, नंदुरबारच्या पोलीस अधीक्षक पदी महिला आयपीएस अधिकारी अश्विनी सानप यांची एन्ट्री!

 श्रवण दत्त. एस यांची अखेर बदली, नंदुरबारच्या पोलीस अधीक्षक पदी महिला आयपीएस अधिकारी अश्विनी सानप यांची एन्ट्री!  (नंदुरबार जिल्हा) रणजित मस...

 श्रवण दत्त. एस यांची अखेर बदली, नंदुरबारच्या पोलीस अधीक्षक पदी महिला आयपीएस अधिकारी अश्विनी सानप यांची एन्ट्री! 


(नंदुरबार जिल्हा) रणजित मस्के प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारने प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे. त्याचवेळी राज्यांतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलींचा हंगामाही सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत हे संकेत अखेर खरे ठरले, यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विविध कारवाईमुळे आणि गुंडगिरी विरोधात घेतलेल्या कडक पवित्रामुळे चर्चेत असलेले नंदुरबारचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस.यांचाही समावेश आहे. नंदुरबारच्या जिल्हा पोलीस अधीक्षक पदी आता पुणे लोहमार्गाच्या पोलीस अधीक्षक कार्यरत असलेल्या अश्विनी सानप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला बऱ्याच वर्षानंतर महिला आयपीएस अधिकाऱ्याची एन्ट्री झाली आहे. तर विद्यमान नंदुरबारचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस. यांची एडीजेपी स्पेशल एक्शन म्हणजे अप्पर पोलीस महासंचालक (विशेष कृती ) आणि सहाय्यक पोलीस महानिरीक्षक आस्थापना यांचे स्टाफ ऑफिसर पदी बदली करण्यात आली आहे. अश्विनी सानप यांच्या आता एन्ट्री मुळे नंदुरबार जिल्ह्यातील गुंडगिरी तसेच इतर अवैध धंदेवर चांगलीच करडी नजर राहणार कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय महिला आयपीएस अधिकारी म्हणून अश्विनी सानप यांची ओळख आहे त्यांनी आजपर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये विविध पदावर तर पोलिस अधीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचा अनुभव म्हणून त्यांच्याकडे आता नंदुरबार पोलीस अधीक्षक पदाची धुरा त्यांच्यावर सोपवली आहे.

No comments