बहुजन टायगर फोर्सच्या वतीने भीम गीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न श्रीरामपूर / प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) महामानव भारतरत्न ...
बहुजन टायगर फोर्सच्या वतीने भीम गीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बहुजन टायगर फोर्सच्या वतीने ३० एप्रिल ३०२६ रोजी रेल्वे स्टेशनसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे भीम गीतांचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन बहुजन टायगर फोर्सचे अध्यक्ष संजय रूपटक्के यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. महाराष्ट्रभर आपल्या सुरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरागिनी वर्षा एखंडे यांनी आपल्या बहारदार सादरीकरणातून उपस्थितांना भारावून टाकले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध आंबेडकरी संघटना आणि पक्षांकडून १५ दिवस भीम गीतांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या उपक्रमांची सांगता बहुजन टायगर फोर्सकडून ३० एप्रिल रोजी भीम गीतांच्या कार्यक्रमाने करण्यात येते. ही परंपरा यंदाही उत्साहात पाळण्यात आली.
कार्यक्रमात कु. दिव्या सरकार शिंदे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी १४ एप्रिल रोजीच्या मिरवणुकीदरम्यान दारू व गुटखा सेवन करणाऱ्या तरुणांवर तीव्र शब्दांत टीका करत सामाजिक भान जपण्याचे आवाहन केले. तसेच जातीवादी विचारसरणीवरही त्यांनी कडाडून प्रहार केला.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे प्रकाश चित्ते, रिपाईचे राजाभाऊ कापसे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन, जय भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सचिन ब्राह्मणे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाचे कौतुक करत आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक दिवे सर, संजय पिटेकर, योगेश बनसोडे, सतीश शिवराळे, गणेश जायगुडे, अंतोन शेळके, मारुती रूपटक्के, कार्तिक बकरे, गोविंद कांदे, सागर पठारे, मतीषा सचिन मांडोळे, गणेश रूपटक्के, सागर चव्हाण, अनिकेत जायगुडे, आदित्य ढोकळे, नितीन जाधव, आशुतोष भालसिंग, आयान शेख, प्रेम देणे धेंडे तसेच बहुजन टायगर फोर्सच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments