हजारो रुग्णांचे आधारवड सूरज यादव यांची श्रमिक कामगार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी निवड पल्लवी पाटील खामगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) खाम...
हजारो रुग्णांचे आधारवड सूरज यादव यांची श्रमिक कामगार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी निवड
पल्लवी पाटील खामगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
खामगाव : समाजसेवा, रुग्णसेवा आणि गौसेवा क्षेत्रात निस्वार्थ भावनेने कार्य करणारे तसेच एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. सूरज शिवमूरत यादव यांची महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दि. ३० मे २०२६ रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रविण समाधान भोटकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
श्री. सूरज यादव यांनी गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. यापूर्वी त्यांनी बुलढाणा जिल्हाध्यक्ष म्हणून सहा वर्षे जबाबदारी सांभाळत संघटनेचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचविले. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात संघटनेचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असून अनेक नवीन कार्यकर्ते संघटनेशी जोडले गेले आहेत.
मूळ खामगाव येथील असलेल्या सूरज यादव यांनी हजारो गोरगरीब, गरजू, दिव्यांग, थॅलेसिमिया, किडनी विकार, कर्करोग, हृदयरोग तसेच विविध गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना मोफत औषधे, आर्थिक मदत आणि रक्त उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय मुख्यमंत्री सहायता निधी, शासकीय योजनांचा लाभ, अपंगत्व प्रमाणपत्र, मोफत उपचार आणि रुग्णवाहिका सेवा मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
‘सेवा परमो धर्मः’ या ब्रीदवाक्यानुसार कार्य करणारे सूरज यादव हे रुग्णसेवा आणि गौसेवा या दोन्ही क्षेत्रांत सक्रिय असून, अनेकांच्या दृष्टीने ते ‘रुग्णांचे आधारवड’ आणि ‘संकटकाळातील देवदूत’ म्हणून ओळखले जातात.
निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सूरज यादव म्हणाले, “प्रविण भोटकर साहेबांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना मिळालेला अनुभव आता प्रदेश पातळीवर उपयोगात आणणार आहे. संघटनेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक गरजू, वंचित, दिव्यांग आणि दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. ही निवड माझी नसून माझ्या सहकाऱ्यांची आणि रुग्णसेवक बांधवांची आहे.”
दरम्यान, त्यांच्या या निवडीबद्दल खामगावसह बुलढाणा जिल्हा, विदर्भ आणि राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध सामाजिक संस्था, रुग्णसेवक, दिव्यांग बांधव आणि नागरिकांनी त्यांना शुभेच्छा देत पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
ही माहिती रुग्णसेवक आशिष सावळे (अकोला) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

No comments