निंभोरा येथे वटसावित्री पौर्णिमा उत्साहात साजरी, महिलांनी वडाच्या झाडाला घातली प्रदक्षिणा (छाया: पूजेसाठी जमलेल्या महिला) रावेर प्रतिनिधी ...
निंभोरा येथे वटसावित्री पौर्णिमा उत्साहात साजरी, महिलांनी वडाच्या झाडाला घातली प्रदक्षिणा 
(छाया: पूजेसाठी जमलेल्या महिला)
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी करण्यात येणारा वटसावित्री पौर्णिमा सण निंभोरा येथे पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
गावातील सुवासिनींनी सकाळपासूनच एकत्र येऊन वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली. हिरव्या, पिवळ्या, लाल रंगाच्या नऊवारी साड्या परिधान करून महिला पूजेच्या ताटासह वडाच्या झाडाजवळ जमल्या. पूजेच्या ताटात हळद-कुंकू, फुले, नारळ, कलश आणि ओटीचे साहित्य होते. महिलांनी वडाच्या झाडाला कच्च्या सूताचे धागे गुंडाळून सात प्रदक्षिणा घातल्या.
यावेळी वडाच्या झाडाखाली बसून काही महिलांनी सावित्री-सत्यवानाची कथा वाचली, तर काहींनी नारळाची ओटी भरून आपला नवस फेडला. लहान मुलांचाही या सोहळ्यात सहभाग दिसून आला. पारंपरिक वेशभूषा आणि पूजेच्या साहित्याने वातावरण भक्तिमय झाले होते. सत्यवानाला यमराजापासून परत आणणाऱ्या सावित्रीच्या पातिव्रत्याचे प्रतीक असलेला हा सण निंभोरा येथील महिलांनी श्रद्धेने साजरा केला. पूजा आटोपल्यानंतर महिलांनी एकमेकींना हळद-कुंकू लावून शुभेच्छा दिल्या.
No comments