आदिवासी कोळी बहुउद्देशीय शिखर संस्थेतर्फे आमदार नंदकिशोर महाजन यांचा जाहीर सत्कार रावेर तालुका प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) तांदलवा...
आदिवासी कोळी बहुउद्देशीय शिखर संस्थेतर्फे आमदार नंदकिशोर महाजन यांचा जाहीर सत्कार
रावेर तालुका प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
तांदलवाडी (ता. रावेर), दि. २८ जून : नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातून रावेर तालुक्याचे युवा नेतृत्व मा. श्री. नंदकिशोर (भाऊ) महाजन यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवून विधानपरिषदेचे आमदार म्हणून शपथ घेतली. या ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांच्या गौरवासाठी आदिवासी कोळी बहुउद्देशीय शिखर संस्था, रावेर ता . रावेर यांच्या वतीने रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी तांदलवाडी येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास आदिवासी कोळी समाजातील माता-भगिनी, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी आमदार नंदकिशोर महाजन यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनोहर पंडीत कोळी (सुलवाडी), उपाध्यक्ष विनोद रामचंद्र कोळी (शिवा भाई G) (पुनखेडा), सचिव योगेश्वर विश्वनाथ कोळी (तांदलवाडी), सहसचिव सुभाष सुकदेव सपकाळे (सुनोदा), खजिनदार विक्की कृष्णा कोळी (चोरवड), कार्याध्यक्ष भूषण प्रकाश तायडे (रावेर), प्रसिद्धी प्रमुख शुभम सुनिल कोळी (निंबोल)
सल्लागार अशोक रामदास कोळी (वाघोदा)
किरण सोपान कोळी (अटवाडा)
गोपाळ सुधाकर कोळी (खिरवड)
प्रमुख सल्लागार विनोद रामदास कोळी (नेहता)
सदस्य संतोष वामन सपकाळे (सिंगत)
संदीप तुकाराम महाले (निभोरा स्टेशन)
विजय देविदास कोळी (अजनाड) सुपडू दोधू मोरे (थोरगव्हाण)
समाधान सदाशिव कोळी (पातोडी) ईश्वर शालीग्राम कोळी (चिनावल)
विनोद मिठाराम कोळी (खिडी)
जयराम चिंतामण कोळी (ऐनपूर) शरद सुपडू कोळी (आंदलवाडी)
उमेश मोहन कोळी (मागलवाडी)
ज्ञानेश्वर पुंडलिक खवले (तांदलवाडी)
तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, सल्लागार आणि सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी समाजाच्या एकजुटीचा संदेश देत भविष्यातही समाजहितासाठी अशाच उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला.

No comments