फैजपूरच्या वार्ड क्र ८ मध्ये विविध समस्या भाजपाच्या सौ नगरसेविका सुनिता नेहेते यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन इदू पिंजारी फैजपूर (संपाद...
फैजपूरच्या वार्ड क्र ८ मध्ये विविध समस्या भाजपाच्या सौ नगरसेविका सुनिता नेहेते यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील वार्ड क्रमांक ८ मधील रस्त्यावर मुरूम टाकून गटारीची साफसफाई करून कचरा व्यवस्थित उचल करावे अशी मागणी भाजपा नगरसेविका सौ सुनिता नेहेते यांनी केली आहे शहरातील मिरची ग्राउंड जवळील जुना आमोदा रोड आसाराम नगर येथील काही भाग मिलतनगर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून चिखल निर्माण झाल्याने नागरिकांना दैनंदिन त्रास सहन करावा लागत आहेत सध्या शाळा सुरू झाल्यामुळे लहान विद्यार्थ्यांना चिखल पाण्यातून जावे लागत असून महिला जेष्ठ नागरिक व इतर नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे वरील वार्डात गटारी तुटलेल्या असून तातडीने दुरुस्ती करण्यात यावी तसेच कचरा उचलण्याचे नियोजन नसल्याने परिसरात दयनीय अवस्था निर्माण झालेली आहेत तरी तात्काळ नगरपालिका प्रशासकांनी वॉर्ड क्र आठ मध्ये समस्या सोडवावे अशी मागणी फैजपूर येथील भाजपाच्या नगरसेविका सौ सुनिता अनंत नेहेते यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे निवेदनाद्वारे केले आहेत

No comments