राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत चोपड्याच्या यज्ञेश इंगळेची चमक! ज्युनिअर गटात 'सुपरस्टार रँक' पटकावत मानाचा बहुमान चोपडा प्रतिनिधी (संप...
राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत चोपड्याच्या यज्ञेश इंगळेची चमक!
ज्युनिअर गटात 'सुपरस्टार रँक' पटकावत मानाचा बहुमान
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा येथील इंद्रायणी कोचिंग क्लासेस अँड जी चॅम्प अबॅकस यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत चोपडा येथील पंकज इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता चौथीतील गुणवंत विद्यार्थी यज्ञेश मंगल इंगळे याने ज्युनिअर अँडव्हान्स गटात उत्कृष्ट कामगिरी करत 'सुपरस्टार रँक' मिळवून चोपडा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
राज्याच्या विविध भागांतून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये यज्ञेशने आपल्या वेगवान गणिती क्षमता, अचूकता, एकाग्रता आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे दैदिप्यमान यश संपादन केले. या यशामुळे त्याने आपल्या शाळेचा, पालकांचा, शिक्षकांचा तसेच चोपडा शहराचा गौरव वाढविला आहे.
यज्ञेशच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पंकज इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, इंद्रायणी कोचिंग क्लासेस अँड जी चॅम्प अबॅकसचे मार्गदर्शक, पालक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, भविष्यातही तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाची नवी शिखरे गाठेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
अबॅकससारख्या बौद्धिक कौशल्य विकसित करणाऱ्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवावा, असा संदेशही यज्ञेशच्या यशातून मिळत आहे.


No comments