adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हेदुलीपाडा येथील हेदअंबा धबधबा तुडुंब; निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी

  हेदुलीपाडा येथील हेदअंबा धबधबा तुडुंब; निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी   जयवंत हागोटे त्रंबकेश्वर (संपादक -:- हेमका...

 हेदुलीपाडा येथील हेदअंबा धबधबा तुडुंब; निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी 


 जयवंत हागोटे त्रंबकेश्वर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदुलीपाडा परिसरातील प्रसिद्ध हेदअंबा धबधबा तुडुंब भरून दिमाखात कोसळत असून, त्याचे मनमोहक रूप पाहण्यासाठी  पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.

हिरव्यागार डोंगररांगा, धुक्याची शुभ्र चादर, फेसाळत वेगाने कोसळणारा धबधबा आणि आल्हाददायक वातावरण यामुळे संपूर्ण परिसर निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र बनला आहे. नाशिक जिल्ह्यासह परिसरातील विविध भागांतून पर्यटक येथे दाखल होत असून, धबधब्याच्या सान्निध्यात रममाण होत छायाचित्रे व व्हिडिओंच्या माध्यमातून अविस्मरणीय क्षण टिपताना दिसत आहेत.

पावसाळ्यात हेदअंबा धबधबा आपल्या पूर्ण क्षमतेने प्रवाहित होत असल्याने त्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. मात्र, पाण्याचा वेग मोठा असल्याने पर्यटकांनी धबधब्याजवळ जाण्याचा मोह टाळावा, सुरक्षित अंतर राखावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

No comments