adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्वर्गीय निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

 स्वर्गीय निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी  प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवा...

 स्वर्गीय निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी 


प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर : स्वर्गीय निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मीडियम स्कूल, मुक्ताईनगर येथे गुरुपौर्णिमेचा पवित्र सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे प्राचार्य श्री व्ही. के.वडस्कर सर उपस्थित होते. त्यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व विशद करत शिक्षण, संस्कार, शिस्त आणि यशस्वी जीवनासाठी गुरुंचे स्थान अनन्यसाधारण असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व अनमोल मार्गदर्शन केले.


यावेळी शाळेतील मुला-मुलींनी 'गुरूंचे जीवनातील महत्त्व' या विषयावर प्रभावी व विचारप्रवर्तक भाषणे सादर केली. आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी गुरु हे ज्ञानाचे दीपस्तंभ असून त्यांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळते, असे मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट वक्तृत्वाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शाळेचे सहशिक्षक श्री तुषार पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप शाळेचे पर्यवेक्षक श्री स्वप्न चौधरी सर यांनी आभार प्रदर्शनासह केला. त्यांनी विद्यार्थ्यांना गुरुजनांचा आदर राखून ज्ञान, संस्कार आणि चारित्र्य जपण्याचा संदेश दिला.

संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे आशीर्वाद घेतले.

No comments