adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

घाडवेल–दोंदवडे रस्ता पावसामुळे चिखलमय; पडलेल्या झाडांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त

 घाडवेल–दोंदवडे रस्ता पावसामुळे चिखलमय; पडलेल्या झाडांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त   अशोक कोळी  घाडवेल (संपादक -:- हेमक...

 घाडवेल–दोंदवडे रस्ता पावसामुळे चिखलमय; पडलेल्या झाडांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त 


 अशोक कोळी  घाडवेल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा तालुक्यातील घाडवेल–दोंदवडे मार्गाची पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सततच्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्यालगतची मोठी झाडे पडून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. मात्र, संबंधित प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थ व शेतकरी करत आहेत.

या रस्त्याने दररोज शेतकरी, विद्यार्थी, नागरिक तसेच दुचाकीस्वारांची झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत व गाड बैल जात नसल्याने आणि पायी पण चालता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना खूप त्रास होत आहे याकडे प्रशासनचे दुर्लक्ष असून शेतकऱ्यांचे हाल बे हाल दिसू लागले सर्व गावकऱ्यांचे नुकसान व फजिती होत आहे गावकऱ्यांची मोठी मागणी आहे की आम्हाला प्रशासनने तात्काळ रस्ता दुरुस्त करून द्यावा अन्यथा आम्ही रस्त्यावर आंदोलन करू अशी मोठी मागण्या आहे व दुचाकी स्वार बऱ्याचदा पळून गेले गावकऱ्यांची मागणी आहे चिखलामुळे वाहने घसरत असून अनेकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. शेतमालाची वाहतूक करणेही कठीण झाले असून शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. 


ग्रामस्थांनी संबंधित विभागाने तात्काळ पडलेली झाडे हटवून रस्त्याची दुरुस्ती करावी, चिखल हटवून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. 


No comments