एस आय आर चे कामकाज यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे - आमदार अमोल भाऊ जावळे रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकव...
एस आय आर चे कामकाज यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे - आमदार अमोल भाऊ जावळे
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथील मतदान केंद्रस्तरीय केंद्राला आमदार अमोल भाऊ जावळे यांनी भेट देऊन एस आय आर कामकाजा विषयी माहिती घेऊन केंद्र अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या व त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. एस आय आर चे कामकाज यशस्वी होण्यासाठी सर्व BLO तसेच सहायकांनी व अंगणवाडी सेविका मदतनीस आशा स्वयंसेविका यांनी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त सहकार्य करावे असे आवाहन करून त्यांनी निंभोरा तालुका रावेर येथील न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूल, जि प शाळा नंबर १, ग्रामपंचायत कार्यालय या सह आदि केंद्रावरील BLO यांना भेट देऊन माहिती घेतली. यावेळी आमदार जावळे यांच्यासोबत विलास चौधरी,अरुण शिंदे, सुर्यकांत देशमुख, श्रीकांत श्रीखंडे, मनोज धनगर तसेच निंभोरा येथील दुर्गादास पाटील,अमोल खाचणे, रवींद्र महाले,सौ नंदिनी पंत,राजीव बोरसे, संदीप कोळी,जितेंद्र कोळी,विजय सोनार,विलास महाले, हे होते.आमदार अमोल भाऊ जावळे यांनी वडगाव विवरा चिनावल रावेर अजंदा या सह आदि गावांना भेटी देऊन एस आय आर यांचा कामकाजाचा आढावा घेतला.

No comments