adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

झाडे लावणे आणि ते टिकवणे ही काळाची नितांत गरज : आमदार हेमंत ओगले

 झाडे लावणे आणि ते टिकवणे ही काळाची नितांत गरज : आमदार हेमंत ओगले   शौकतभाई शेख /श्रीरामपूर: (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  येणाऱ्या काळात झा...

 झाडे लावणे आणि ते टिकवणे ही काळाची नितांत गरज : आमदार हेमंत ओगले  


शौकतभाई शेख /श्रीरामपूर:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 येणाऱ्या काळात झाडे लावणे आणि ते टिकवणे ही काळाची गरज बनली आहे मी नगराध्यक्ष करण ससाणे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी आभार मानतो नागरिकांनी देखील जागरुक राहून या चळवळीत सक्रिय सहभागी व्हावे असे आमदार हेमंत ओगले यांनी म्हटले आहे.

     श्रीरामपूर नगरपरिषदे मार्फत वृक्ष लागवडीचा शुभारंभ आमदार हेमंत ओगले यांच्या हस्ते करण्यात आला.

     यावेळी नगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले की, हरित श्रीरामपूर साठी शहरातली नागरिकांनी पुढाकार घ्यावा नगरपालिका नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करेल. आपले श्रीरामपूर शहर हे स्वच्छ आणि सुंदर शहर कसे होईल यासाठी आपण सर्वच एकजुटीने प्रयत्न करु असे ससाणे म्हणाले.

     यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, सभापती बाबासाहेब दिघे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, उपनगराध्यक्ष कांचन सानप, सभापती मंजुश्री मुरकुटे, उपसभापती नागेश्वरी एडके , नगरसेविका निलोफर शेख, आशा परदेशी, वैशाली पोटे, सोनिया कक्कड, योगिता नागले, सभापती दिपक वमने, योगेश जाधव, नगरसेवक गोपाल लिंगायत, डॉ.दिलीप शिरसाठ , दत्तात्रय सानप, महमद शेख, डॉ . देशपांडे, डॉ.सोमाणी, रितेश एडके, संतोष परदेशी, बिट्टूशेठ कक्कड, अरुण मंडलिक, संजय गोसावी, सरबतजीत चूग, रितेश चव्हाणके, सागर भागवत, अभिजीत लिप्ते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

श्रीरामपूर - 9561174111

No comments