जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा आधार!सलग १८ वर्षापासून वाघाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप. रा...
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा आधार!सलग १८ वर्षापासून वाघाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील वाघाडी येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे माजी पंचायत समिती सदस्य दीपक पाटील यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करीत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा आधार देण्यासाठी अखंडितपणे
सन 2009पासून सलग अठरा वर्ष वाघाडी तालुका रावेर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला एक दप्तर,वह्या,कंपास,पेन्सिल,पेन,खोडरबर,शॉपनर,पट्टी आदी शैक्षणिक साहित्य देण्यात येते.
यावेळी वाघाडी तालुका रावेर येथील माजी उपसरपंच श्री राजेंद्र विठ्ठल महाजन श्री बाळू नामदेव कोळी,माजी सरपंच श्री अशोक कोळी, श्री दामोदर महाजन,माजी उपसरपंच श्री दिलीप चौधरी, श्री शालिक महाजन, श्री वेंकट पाटील,श्री बाळू पाटील, ह भ प श्री भाऊराव पाटील,श्री गणेश महाजन श्री मिलिंद चौधरी श्री किरण कोळी, श्री हर्षल पाटील, श्री शांताराम कोळी, शाळेचे मुख्याध्यापक श्री जंगले सर, श्री गिरीश पाटील सर, तलाठी श्री तिवारी, व ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments