adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भर पावसात तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांची शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी स्वतः ट्रॅक्टर चालवत शिवारात पोहोचले; हातेड बुद्रुक येथे रस्त्याचे स्थळ निरीक्षण

 भर पावसात तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांची शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी स्वतः ट्रॅक्टर चालवत शिवारात पोहोचले; हातेड बुद्रुक येथे रस्त्याचे स्थळ...

 भर पावसात तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांची शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी

स्वतः ट्रॅक्टर चालवत शिवारात पोहोचले; हातेड बुद्रुक येथे रस्त्याचे स्थळ निरीक्षण 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा : शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी चोपडाचे तहसीलदार भाऊसाहेब जी. थोरात यांनी भर पावसात हातेड बुद्रुक शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. विशेष म्हणजे, चिखलमय व दुर्गम रस्त्यामुळे त्यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत शेतात जाऊन रस्त्याचे व परिसराचे स्थळ निरीक्षण केले.

हातेड बुद्रुक येथील गट क्रमांक २७० मधील शेतकरी कुंदन रवींद्र सनेर यांच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील अडचणी जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या तसेच आवश्यक त्या उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. 


या पाहणीदरम्यान महसूल सहाय्यक गरुडकर, तलाठी अमित चावरे (हातेड बुद्रुक), शिपाई पिंटू, युवा प्रशिक्षणार्थी पीकपेरा सहाय्यक राहुल बाविस्कर, तसेच शेतकरी कुंदन रवींद्र सनेर व स्वप्निल गणेश सनेर उपस्थित होते.

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी भर पावसात स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. प्रशासनाने प्रत्यक्ष शेतात येऊन समस्यांची पाहणी केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली असून, त्यांच्या या कार्यपद्धतीचे परिसरात कौतुक होत आहे.

No comments