adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रकाश विद्यालय व जुनिअर कॉलेज मोठे वाघोदा येथे बक्षीस वार्षिक बक्षीस वितरण समारंभ 74000 हजार रुपयांची बक्षिसे प्रथम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वाटप

  प्रकाश विद्यालय व जुनिअर कॉलेज मोठे  वाघोदा  येथे बक्षीस वार्षिक बक्षीस वितरण समारंभ  74000 हजार रुपयांची बक्षिसे प्रथम उत्तीर्ण विद्यार्थ...

 प्रकाश विद्यालय व जुनिअर कॉलेज मोठे  वाघोदा  येथे बक्षीस वार्षिक बक्षीस वितरण समारंभ 

74000 हजार रुपयांची बक्षिसे प्रथम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वाटप 


 मुबारक तडवी रावेर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक येथील चक्रधर शिक्षण मंडळ संचालित प्रकाश विद्यालय व जुनिअर कॉलेज   येथे बक्षीस वार्षिक बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रकाश विद्यालयाच्या वर्षभरातील झालेल्या सर्व स्पर्धा त्याचप्रमाणे दहावी-बारावी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम त्यांच्या अभिनंदन करण्याचा हा दिवस... या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक त्याचप्रमाणे पालक, विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमात सुरुवातीला प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय श्री आर पी बडगुजर सर यांनी केले. श्री चक्रधर शिक्षक मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय श्रावण सिताराम महाजन साहेब यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले. त्याचप्रमाणे श्री  चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. विद्यालयातील संगीतशिक्षक श्री व्ही बी बारहे सर  आणि आमच्या प्रकाश गीत मंचाच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर करत वातावरण मंत्रमुग्ध केले


श्री चक्रधर शिक्षक मंडळाचे चेअरमन आ. श्री डी के महाजन साहेब, अध्यक्ष श्री पी टी महाजन साहेब, व्हाईस चेअरमन श्री विजयकुमार बाजीराव पाटील साहेब, सहसचिव श्री पी एल महाजन साहेब, संचालक मंडळातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मागील वर्षांमध्ये इयत्ता दहावी व बारावी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या वर्गातून सर्व प्रथम विद्यार्थ्यांना स्वर्गीय श्री सुभाष बाबुराव पाटील यांच्या स्मरणार्थ चांदीचे पदक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले, त्यानंतर विद्यालयात होणाऱ्या विविध स्पर्धा गीता जयंती ,भावगीत स्पर्धा वकृत्व स्पर्धा व रंगभरण स्पर्धा यांचे बक्षीस वाटप करण्यात आले, याप्रसंगी श्री चक्रधर शिक्षण मंडळाचे संचालक श्री राहुल पाटील साहेब संस्थेचे संचालक, श्री डॉक्टर गुरुदत्त पाटील उपस्थित होते.  प्राथमिक विभागाच्या उपशिक्षिका सौ दीपमाला इंगळे मॅडम यांनी बक्षिसांचे वाचन केले तर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या बक्षिसांचे वाचन विद्यालयातील उपशिक्षक श्री यु जी महाजन सर, श्री एम जी लासुरे सर, सौ तेजस्विनी पाटील मॅडम, यांनी केले. अध्यक्षीय  मनोगत श्री चक्रधर शिक्षक मंडळाचे सहसचिव श्री पी एल महाजन साहेब यांनी केले. प्रयत्नांती परमेश्वर असा मोलाचा सल्लाही दिला आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाला प्रेरित केले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन विद्यालयातील उपशिक्षिका सौ भावना पाटील मॅडम यांनी केले तर आभार विद्यालयातील उपशिक्षक श्री व्ही.एम चौधरी सर यांनी केले . याप्रसंगी गावातील पालक, विद्यार्थी, देणगीदार , वार्ताहर विद्यालयातील मुख्याध्यापक पर्यवेक्षकसर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये एकूण जवळपास 74000 हजार रुपयांची बक्षिसे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली. अशाप्रकारे कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.

No comments