adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राष्ट्रीय वैदिक मॅथ्स स्पर्धेत चोपड्याच्या हर्षल जाधवचा देशात प्रथम क्रमांक पहिल्या लेव्हलमध्ये सुवर्णयश; ‘चॅम्पियन’ पदावर मानाचा तुरा — चोपडा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा

 राष्ट्रीय वैदिक मॅथ्स स्पर्धेत चोपड्याच्या हर्षल जाधवचा देशात प्रथम क्रमांक पहिल्या लेव्हलमध्ये सुवर्णयश; ‘चॅम्पियन’ पदावर मानाचा तुरा — चो...

 राष्ट्रीय वैदिक मॅथ्स स्पर्धेत चोपड्याच्या हर्षल जाधवचा देशात प्रथम क्रमांक

पहिल्या लेव्हलमध्ये सुवर्णयश; ‘चॅम्पियन’ पदावर मानाचा तुरा — चोपडा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा 


चोपडा (विशेष प्रतिनिधी) 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 येथील‘प्रणव ॲबॅकस क्लासेस’चा विद्यार्थी हर्षल जाधव याने राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘वैदिक मॅथ्स’ स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. हर्षलने पहिल्या लेव्हलमध्ये देशातून प्रथम क्रमांक पटकावत ‘चॅम्पियन’ होण्याचा बहुमान मिळविला आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे चोपडा शहरासह संपूर्ण परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

‘आराध्या प्रतिष्ठान’ अंतर्गत ‘ए. व्ही. ॲबॅकस अकॅडमी’तर्फे आयोजित १६ वी राष्ट्रीय स्तरीय स्पर्धा नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेत देशभरातून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या आणि आव्हानात्मक ठरलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत हर्षलने आपल्या वेगवान गणितीय कौशल्य, अचूकता, बुद्धिमत्ता आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर देशात प्रथम क्रमांक मिळवून आपल्या गुणवत्तेची राष्ट्रीय स्तरावर छाप उमटवली. 


हर्षलच्या या दैदिप्यमान यशाबद्दल प्रणव ॲबॅकस क्लासेसचे संचालक व शिक्षक, तसेच चोपडा परिसरातील विविध मान्यवर, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आपल्या यशामागे स्वतःची मेहनत, आई व कुटुंबीयांचे पाठबळ तसेच प्रणव ॲबॅकस क्लासेसच्या मार्गदर्शकांचे मार्गदर्शन असल्याचे हर्षलने सांगितले. राष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या या यशामुळे हर्षलच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

हर्षल जाधवच्या या अभिमानास्पद यशाबद्दल त्याची आई प्रियांका बळीराम गायकवाड, आजी मंगलाबाई बळीराम गायकवाड, मावशी चंद्रसेना बळीराम गायकवाड, मामा रेवननाथ बळीराम गायकवाड, मामी शालिनी रेवननाथ गायकवाड, मामा हेमकांत बळीराम गायकवाड आणि मामी भाग्यश्री हेमकांत गायकवाड यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

“हर्षलने मिळविलेला देशातील प्रथम क्रमांक हा केवळ त्याचा व्यक्तिगत विजय नसून चोपडा शहरासाठी अभिमानाची बाब आहे,” अशा भावना यावेळी शुभेच्छुकांनी व्यक्त केल्या.

No comments