adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सावदा येथे बोहरी समाजातर्फे ईद-ए-मिलाद उत्साहात संपन्न

 सावदा येथे बोहरी समाजातर्फे ईद-ए-मिलाद उत्साहात संपन्न  मुबारक तडवी रावेर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  सावदा येथील सकल बोहरी समाजाच्या वत...

 सावदा येथे बोहरी समाजातर्फे ईद-ए-मिलाद उत्साहात संपन्न

 मुबारक तडवी रावेर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 सावदा येथील सकल बोहरी समाजाच्या वतीने पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांचा जन्मदिवस ईद-ए-मिलाद मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला.

यानिमित्ताने बोहरी समाजाच्या वतीने सावदा शहरातील प्रमुख मार्गावरून शिस्तबद्ध व भव्य ईद-ए-मिलाद मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीतील बोहरी समाजाचे शिस्तबद्ध बँड पथक विशेष आकर्षण ठरले. पारंपरिक उत्साह आणि शिस्तीचे दर्शन घडवत ही मिरवणूक चांदणी चौकातील बोहरी समाजाच्या मशिदीजवळ पोहोचली, तेथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

यानंतर मशिदीत ईद-ए-मिलादची नमाज अदा करण्यात आली. नमाज पठणानंतर समाजबांधवांनी एकमेकांना ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा देत हा पवित्र दिवस उत्साहात साजरा केला.

या संपूर्ण कार्यक्रमात सावदा शहरासह परिसरातील बोहरी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे शहरात धार्मिक व सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण झाले.

No comments