पी. एम. श्री. जि. प. उर्दू शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर गीत आणि भाषणे केले सादर मुबारक तडवी रावे...
पी. एम. श्री. जि. प. उर्दू शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा
विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर गीत आणि भाषणे केले सादर
मुबारक तडवी रावेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर, दि. १५ ऑगस्ट : पी. एम. श्री. जि. प. उर्दू शाळा, रावेर येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला. शाळेच्या प्रांगणात मान्यवर मो मुख्तार मो शफी पदवीधर शिक्षक यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची माहिती सांगितली. मुख्याध्यापक मो. आरिफ शिक्षक यांच्या अध्यक्षतेखाली हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुपडू भाई व समिती सदस्य तथा शाळेतील ज्येष्ठ शिक्षक नाजीम. शिक्षक रईस शिक्षक. युनूस सर.अजिज सर.विकार सर गुलरेज सर अजहर सर इरफान सर नवीद सर अंशकालीन कयाम सर अजहर सर व वसीम सर पालक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments