लासुरच्या विद्यार्थ्यांकडून 300 सीडबॉल्सची लागवड विश्राम तेले चौगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) लासुर ता.चोपडा येथे पर्यावरण संवर्धनाचा...
लासुरच्या विद्यार्थ्यांकडून 300 सीडबॉल्सची लागवड
विश्राम तेले चौगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लासुर ता.चोपडा येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, लासुर येथील विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या कडेला तब्बल 300 सीडबॉल्स (बीजगोळे) लावून अनोखा पर्यावरणपूरक उपक्रम राबविला.
विद्यार्थ्यांनी विविध झाडांच्या बियांचा समावेश असलेले सीडबॉल्स तयार करून रस्त्याच्या दुतर्फा योग्य ठिकाणी त्यांची लागवड केली. पावसाळ्यातील अनुकूल वातावरणाचा फायदा घेत या बियांपासून रोपांची निर्मिती व्हावी आणि भविष्यात रस्त्यांच्या कडेला हिरवाई निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून ‘एक विद्यार्थी–एक झाड’ तसेच पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. वाढते प्रदूषण, वृक्षतोड आणि बदलते हवामान याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद असल्याचे नागरिकांनी सांगितले.
विद्यालयातील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हा उपक्रम उत्साहाने पूर्ण केला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री आर एस पाटील, उप प्राचार्य श्री आर एल बाविस्कर पर्यवेक्षक श्री एस जी पाटील व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.

No comments