धानोरा विकास सोसायटीच्या संचालकपदी राजू मुशीर तडवी मुबारक तडवी रावेर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मोहरद तालुका चोपडा येथील सामाजिक कार्य...
धानोरा विकास सोसायटीच्या संचालकपदी राजू मुशीर तडवी
मुबारक तडवी रावेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मोहरद तालुका चोपडा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे प्रदेश कार्यकारिणी उपाध्यक्ष राजु (मेहरबान) मुशीर तडवी यांची धानोरा व मोहरद या दोन्ही गावांची संयुक्त असलेल्या येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी एकुण १७ संचालक असुन त्यातील एक संचालकाने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी संस्येचे चेअरमन पंकज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संस्येच्या सभागृहात नुकतीच मासिक सभा घेण्यात आली व रिक्त पदावर मोहरद येथील रहिवासी व राष्ट्रवादी कांग्रेस आदीवासी सेलचे माजी जिल्हा अध्यक्ष राजु मुशीर तडवी यांची सर्वनुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी अनिल महाजन, विजय पाटील, कैलास महाजन, सतीष महाजन, अशोक पाटील, विकास महाजन, इत्यादि संचालक तसेच सचिव संजय जोशी ऊपस्थित होते. तडवी यांच्या निवडी ने त्याचा संस्थेचे पदाधीकारींनी स्वागत केले.

No comments